Childhood Obesity : मुलांचे अचानक वजन वाढतेय ? आजार आहे की, आणखी कोणती नवी समस्या ? ह्याचे नेमके कारण काय ?

मुलांचे वजन अचानक का वाढते आहे ?
Child obesity, Overweight, kids health issue
Child obesity, Overweight, kids health issue ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Child obesity : वाढत्या वयात मुलांच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी किंवा खेळण्याच्या पध्दतीतही बदल जाणवू लागतात.

हे देखील पहा -

लहान मुलांच्या (Child) मध्ये लठ्ठपणा ही समस्या झपाट्याने वाढणारी आरोग्याची समस्या बनत आहे. याचे मुख्य कारण असू शकते बदलेली जीवनशैली. यामुळे भविष्यात मुलांना अनेक गंभीर समस्येला सामोरे जावे लागू शकते. ज्यात मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी, संधिवात आणि इतर अनेक संबंधित आरोग्य विकार होऊ शकतात. साखरेचे (Sugar) किंवा अधिक चरबी असणाऱ्या पदार्थाचे सेवन केल्यास मुलांचे वजन वाढू शकते. फास्ट फूड, कँडी आणि सॉफ्ट ड्रिंक्स, गोठवलेले जेवण, खारट स्नॅक्स आणि कॅन केलेला पास्ता यांसारख्या पदार्थांमुळे ही मुलांचे वजन वाढू लागते.

बदलत्या आहार आणि शारीरिक हालचालींमुळे, जास्त वजन आणि लठ्ठपणा या समस्या देखील उद्भवत आहेत. चरबी आणि साखर जास्त असलेल्या प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचा वापर वाढत आहे. पौगंडावस्थेतील मुलींमध्ये जास्त वजन आणि लठ्ठपणा हे प्रौढ महिलांमधील लठ्ठपणाशी संबंधित आहे, ज्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लहान मुलांचे जास्त वजन आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो, असे युनिसेफ इंडियाच्या अहवालात म्हटले आहे.

Child obesity, Overweight, kids health issue
Muscle Health : शरीरातील स्नायू बळकट असणे महत्त्वाचे आहे का ? त्याचे कार्य कसे असते ? वयोमानानुसार स्नायूंचे आरोग्य कसे बदलते ?

शारीरिक हालचालींचा अभाव बालपणातील लठ्ठपणाचे आणखी एक कारण असू शकते. शरीराची हालचाल न झाल्यास कॅलरी बर्न होत नाही त्यामुळे वजन वाढू लागते. या गोष्टीमध्ये मुलांना सक्रिय राहण्यास प्रोत्साहन द्यायला हवे जे आपण त्यांना देत नाही. मैदानी खेळ किंवा शारीरिक व्यायाम मुलांकडून करुन घेतल्यास अतिरिक्त कॅलरी जाळण्याची शक्यता असते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com