Christmas Cake Recipe : ख्रिसमसच्या निमित्ताने मुलांसाठी बनवा खास बिस्किटांचा केक!

जर तुम्ही आज ख्रिसमस केक बनवण्याचे प्लॅनिंग करत आहात आणि कमी साहित्यात चांगला केक अशाप्रकारे बनवा
Christmas Cake Recipe
Christmas Cake RecipeSaam Tv

Christmas Cake Recipe : दरवर्षीप्रमाणे आपल्या प्रत्येकाची ख्रिसमसची तयारी झाली असेल. ख्रिसमसच्या सेलिब्रेशनची तयारी करत असताना आपल्या मनात पहिला विचार येतो तो म्हणजे सांताक्लॉज, ख्रिसमस ट्री आणि केक. यासणानिमित्त आपण अनेक कुकीज, केक आणि बिस्किटांचा आस्वाद घेत असतो.

जर तुम्ही आज ख्रिसमस केक बनवण्याचे प्लॅनिंग करत आहात आणि कमी साहित्यात चांगला केक कसा बनवायचा हे समजत नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अतिशय चविष्ट आणि सोप्या बिस्किट केकची रेसिपी सांगणार आहोत जी तुम्ही अगदी कमी पदार्थात बनवू शकता. चांगली गोष्ट म्हणजे हा केक बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि जास्त मेहनतही लागत नाही.

यासाठी तुम्हाला बिस्किटे, कोको पावडर, दूध आणि कॉर्न फ्लोअर लागेल. ख्रिसमस लुक देण्यासाठी तुम्ही याला ड्रायफ्रुट्सने सजवू शकता. चला तर मग विलंब न लावता आम्ही तुम्हाला घरी बनवलेल्या बिस्किट केकची सोपी रेसिपी सांगतो.

Christmas Cake Recipe
Christmas Cake : घरच्या घरी बनवा बेकरीसारखा स्वादिष्ट असा फ्रूटी केक !
Christmas Cake Recipe
Christmas Cake RecipeCanva

होममेड बिस्किट केकचे साहित्य

  • २ कप बिस्किटाचे तुकडे

  • 100 ग्रॅम कोको पावडर

  • 1 कप दूध

  • २ चमचे कॉर्न फ्लोअर

गार्निशिंग साठी

  • 1 कप अक्रोड

  • 1 कप बदाम

  • 1 कप चॉकलेट चिप्स

होममेड बिस्किट केक कसा बनवायचा

  1. कोको पावडरला दुधात (Milk) गरम करा हे मिश्रण घट्ट होण्यासाठी दोन चमचे कॉर्नफ्लोअर घाला, आवश्यकतेनुसार साखर (Sugar) घाला आणि जाड चॉकलेट सॉस तयार होईपर्यंत मंद आचेवर गरम करा. थंड होण्यासाठी ठेवा.

  2. एक सपाट डबा घ्या आणि त्यात तुमच्या आवडीचे बिस्किटाचे तुकडे घाला

  3. बिस्किटावर कोको सॉसचा जाड थर पसरवा आणि काही बदाम आणि अक्रोड घाला.

  4. सॉसवर बिस्किटांचा दुसरा थर ठेवा आणि चॉकलेट सॉसचा शेवटचा थर झाकून जाईपर्यंत प्रक्रिया पुन्हा करा ज्याला तुम्ही चॉकलेट चिप्स, नट किंवा इतर रंगीत कँडीज किंवा चॉकलेटने सजवू शकता.

  5. 30 मिनिटांसाठी डीप फ्रीझ करा. तयार होईल बिस्किटांचा केक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com