Cleaning Hacks : कपड्यांना किंवा इस्त्रीला जळण्याचे डाग लागले असतील तर ते अशाप्रकारे स्वच्छ करा

इस्त्रीला लागलेले हट्टी डाग कसे काढाल ?
Iron rust, Cleaning Hacks, Cleaning tips
Iron rust, Cleaning Hacks, Cleaning tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Cleaning Hacks : आपल्याला सवय असते की, कपड्यांना खोलवर किंवा हट्टी डाग लागेपर्यंत ते आपण साफ करत नाही. त्यामुळे ते लवकरही निघत नाही.

हे देखील पहा -

इस्त्री करताना बऱ्याचदा कापड जळते किंवा खूप उष्णतेमुळे प्रेस लाल होते. ते साफही करता येत नाही. आपल्या प्रेसला असे काही झाले असेल व आपण त्याला चमकवण्याचा प्रयत्न करत असू तर आपण त्यावर काही घरगुती उपाय जाणून घेऊया. ज्यामुळे कपड्याला लागलेले इस्त्रीचे डाग जातील व इस्त्रीचा लालसरपणाही कमी होईल.

१. पॅरासिटामॉल हे औषध (Medicine) ताप आल्यावर खाल्ले जाते. कोणत्याही कापडाने जळल्याने प्रेस खराब होत असेल तर पॅरासिटामॉल फायदेशीर ठरेल. यासाठी जाड कापड घेऊन त्यात इस्त्री गरम करा. त्यानंतर कापडावर पॅरासिटामॉलची गोळी ठेवून इस्त्री गरम झाल्यावर बंद करा व हळूहळू कपड्यावर दाब द्या.

Iron rust, Cleaning Hacks, Cleaning tips
Skin Damaging Home Remedies: या गोष्टी कधीही विचार करता त्वचेवर लावू नका, या घरगुती उपायांनी आपली त्वचा होऊ शकते खराब

२. बेकिंग सोडा व पाण्याने देखील इस्त्रीचा डाग घालवू शकतो. एक चमचे पाण्यात (Water) २ चमचे बेकिंग सोडा टाकून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट रबरी चमच्याने प्रेसवर लावा आणि २ ते ३ मिनिटे ठेवल्यानंतर ओल्या कापडाने स्वच्छ करा. आता प्रेसच्या वाफेने पाणी भरल्यानंतर, प्रेसला कपड्यावर चालवा जेणेकरून बेकिंग सोडा पेस्ट प्रेसमध्ये राहणार नाही.

३. प्रेसवरील गंज काढून टाकण्यासाठी चुना आणि मीठ वापरले जाऊ शकते. यासाठी एका भांड्यात मीठ आणि चुना समप्रमाणात घेऊन पाण्याने पेस्ट बनवा. ही पेस्ट गंजलेल्या लोखंडावर लावा आणि काही वेळ ठेवल्यानंतर कापडाने स्वच्छ करा. गंज काढण्यासाठी, प्रेसला सँडपेपरने हलके चोळा ज्यामुळे गंजच्या वरचा थर हळूहळू निघून जाण्यास मदत होईल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com