Stress Buster Tips : सतत मनावर ताण येतोय? हा जीवघेणा स्ट्रेस नकोय तर, 'या' टिप्स फॉलो करा

तणाव दूर करायचा आहे ? या टिप्स फॉलो करा
Stress Buster Tips
Stress Buster TipsSaam Tv

Stress Buster Tips : बदलेल्या जीवनशैलीमुळे किंवा कामाच्या व्यापामुळे आपल्यापैकी बरेच लोक हे व्यस्त असतात. कामाचा व्याप इतका असतो की, आपल्याला साधा श्वास घेणे देखील अवघड जाते.

काहीवेळेस ऑफिस (Office) किंवा घरातल्या कारणांमुळे आपण सतत चिंतेत असतो. ताण वाढल्यामुळे त्याचा आपल्या शरीराबरोबर मनावर देखील परिणाम होतो. अशावेळी आपण आपल्या गोष्टी कोणाला शेअरही करु शकत नाही त्यामुळे कधीकधी चुकीचे पाऊल उचलण्याची शक्यता अधिक असते.

Stress Buster Tips
Stress Problem : सतत ताण येतो ? डोकेदुखी वाढते ? दिवसभरातील ताण कसा कमी कराल ?

कार्यालयीन कामाचा ताण (Stress), अभ्यासाचा ताण, आर्थिक समस्या, कौटुंबिक कलह, प्रेम किंवा मैत्रीत फसवणूक अशा काही समस्या असल्यास ताण आणखी वाढत जातो, कारण जास्त विचार करणे हा तणावावर उपाय असू शकत नाही. तणावामुळे आपल्या शरीरात अनेक प्रकारचे हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

अशा प्रकारे तणाव दूर करा-

१. एकाच जागी जास्त वेळ बसू नका -

अनेकवेळा ऑफिसच्या वेळेत किंवा वर्क फ्रॉम होम करताना एकाच ठिकाणी बराच वेळ बसून राहतात, अशा परिस्थितीत तणाव निर्माण होऊ शकतो. यावर उपाय असा आहे की आपण दर एक तासानंतर काही मिनिटांचा ब्रेक घ्या आणि तरीही काही परिणाम होत नसेल तर पॉवर नॅप म्हणजेच एक झोप घेऊन तणाव दूर करा.

२. कामाचे जास्त ओझे घेऊ नका -

कठोर परिश्रम करण्यात फारसे नुकसान नाही, परंतु प्रत्येक व्यक्तीमध्ये एक क्षमता असते, त्यानंतर तो कामाचा दबाव सहन करू शकत नाही. सर्वप्रथम, आपल्याला किती कामाचा भार सहन करावा लागेल याची कल्पना यायला हवी, कारण आपले शरीर आणि मेंदू क्षमतेच्या बाहेर गेले तर नक्कीच समस्या निर्माण होऊ शकते.

Stress Buster Tips
Stress Benefits : थोडासा ताण हा आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे ! जाणून घ्या कसा?

३. बोलण्याने प्रकरण निवळेल -

अनेकवेळा जेव्हा आपण तणावाला बळी पडतो तेव्हा आपण पूर्ण एकांतात जातो, कधी स्वतःला खोलीत कोंडून घेतो, कधी मोबाईल फोन बंद करतो, पण असे केल्याने तणावातून मुक्ती मिळत नाही, तर उलट तो आणखी वाढतो. या मधून बाहेर पडण्यासाठी जास्तीत जास्त लोकांशी बोला, भेटता येत नसेल तर निदान फोनवरून तरी आपली समस्या सांगा. आपण जितक्या जास्त समस्या सामायिक कराल तितके आपले मन हलके होईल. काहीवेळा आपल्या जवळचे लोक तणाव कमी करण्यात अधिक चांगली मदत करू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com