Skin Care Tips : देशी तूपाचे केवळ आरोग्यासाठीच नाहीतर त्वचेसाठीही अनेक फायदेशीर !

Ghee Benefits : त्वचेसंबंधित समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला देसी तूप आवश्यकता आहे.
Skin Care Tips
Skin Care TipsSaam tv

Ghee Benefits For Skin : महिला स्वतःची त्वचा सुदंर आणि निरोगी ठेवण्यासाठी वेगवगळे प्रयत्न करत असतात. निरोगी त्वचा मिळवण्यासाठी ब्रँडेड प्रोडक्ट्सचा वापर करतात. एवढे करूनही महिलांना त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

तुमच्या सोबतही असे होत असेल, तर त्यासाठी तुम्ही घरच्या घरी काही उपाय करू शकता. त्वचेसंबंधित समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला देसी तूप आवश्यकता आहे. आयुर्वेदात (Ayurved) देसी तुपाचा वापर वर्षानुवर्ष विविध आजार (Disease) दूर करण्यासाठी केला जात आहे.

Skin Care Tips
Skin Care Tips : त्वचेवरील सौंदर्य हरवले? तर हळदीचे उटणे वापरून पाहा

ब्यूट्रिक ऍसिड , ओमेगा-3 फॅटी ऍसिडस् , व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई , व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन (vitamins) बी 12 या पोषक तत्वांचे देसी तुपामध्ये भरपूर प्रमाणात. हे पोषक घटकच निरोगी त्वचा (Skin) ठेवण्यासाठी फायदेशीर असतात.

त्वचेला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानापासून वाचवण्याचे कार्य देसी तूप करते. त्यामुळे तूप त्वचेच्या समस्यांसाठी फायदेशीर समजले जाते. चला तर मग जाणून घेऊया त्वचेला देसी तुपाचे होणारे फायदे.

Skin Care Tips
Skin Care Tips : टॅनिंग टाळण्यासाठी असा करा कोरफडचा वापर करा

1. त्वचेवरील कोरडेपणा दूर करण्यासाठी

देसी तुपात असलेले व्हिटॅमिन ए आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिड चे प्रमाण त्वचेला नैसर्गिकरित्या हायड्रेट राहण्यासाठी मदत करतात. त्यासोबतच त्वचा डीप मॉइस्चराइजसाठी तुप फायदेशीर आहे. त्यामुळे त्वचेवरील कोरडेपणाची समस्याही दूर आणि त्वचा सॉफ्ट राहते

2. पिगमेंटेशन दूर करते

पिगमेंटेशनच्या समस्या दूर करणायसाठी तुप फायदेशीर आहे. तुपामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि ऑक्सिडेटिव्ह गुणधर्म असतात, जे तणाव कमी करण्यासाठी सहकार्य करतात. ज्यामुळे पिगमेंटेशन मार्क्स देखील दूर होतात आणि त्वचेवरील चमक वाढते.

Skin Care Tips
Skin Care Tips : चेहऱ्याची कांती उजळवण्यासाठी असा करा केळीचा वापर, दिवसभर राहाल ग्लो !

3. सुरकुत्या दूर करण्यासाठी

तूप कोलोजन प्रोडक्शन वाढवते, ज्यामुळे सुरकुत्याच्या समस्या टाळता येतात. म्हणून तुम्ही घरच्या घरी तुपाचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करू शकता. ओमेगा-३ फॅटी ऍसिडचे गुणधर्म तुपात असतात. जे चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी मदत करते.

4. चेहऱ्यावर ग्लो वाढवण्यासाठी

नियमितपणे दररोज चेहऱ्याला देसी तुपाने मालिश केल्याने रक्ताभिसरण वाढते. परिणामी त्वचेवर चमक येते. त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो टिकवणून ठेवण्यासाठी तुम्ही देसी तुपाचा वापर करू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com