Diabetes Health Tips : हिवाळ्यात मधुमेहींना असा ठेवा आहार, अन्यथा वाढेल रक्तातील साखर

खाण्यापिण्याची एक चुकीची सवय रक्तातील साखर सातत्याने वाढवू शकते.
Diabetes Health Tips
Diabetes Health TipsSaam Tv

Diabetes Health Tips : मधुमेहींच्या रुग्णांना अनेक त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत चिंता वाटू लागते. खाण्यापिण्याची एक चुकीची सवय त्यांच्या रक्तातील साखर सातत्याने वाढवू शकते. ज्या व्यक्तीला ह्या आजाराचा त्रास जडला की त्यातून आयुष्यभर त्याची सुटका होणे अशक्य.

भारतातील करोडो लोकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे म्हणूनच भारताला मधुमेहाची राजधानी मानले जाते. सामान्यत: हे खराब जीवनशैली आणि अस्वस्थ खाण्याच्या सवयींमुळे होते, म्हणून आपण दिवसभर काय खातो आणि पितो याची काळजी घेतली पाहिजे, विशेषतः हिवाळ्याच्या काळात यात बरेच बदल दिसून येतात.

Diabetes Health Tips
Diabetes Rules : मधुमेहींनो, वाढत्या थंडीत 'या' 5 नियमांचे पालन करा; अन्यथा...

डायबिटीजच्या रुग्णांनी सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात त्यांचा आहार निश्चित केला पाहिजे आणि त्याचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. जर तुम्ही कोणत्याही अस्वास्थ्यकर पदार्थांचे सेवन केले असेल तर रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

हिवाळ्यात मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांनी फायबर आणि प्रथिनेयुक्त आहार नाश्त्यात घ्यावा. विशेषत: हंगामी फळे आणि भाज्यांचा रस तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. आता तुम्ही ब्लॅक कॉफी, उकडलेले अंडे, रताळे, पेरू आणि गाजराचा रस घेऊ शकता.

मधुमेही रुग्णांनी दुपारच्या जेवणात उच्च फायबरयुक्त आहार घ्यावा कारण त्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि जास्त वेळ भूक लागत नाही, तसेच रक्तातील साखरेची (Sugar) वाढ होत नाही. पालक, गाजर, मुळा आणि मल्टीग्रेन पिठाची भाकरी दुपारी खावी.

लोकांना सहसा संध्याकाळी भूक लागते, म्हणून संध्याकाळी कमी कॅलरी स्नॅक्स घ्या जेणेकरून भूक वाढू नये. तुम्ही बदाम आणि अक्रोड सारखे ड्राय फ्रूट्स खाऊ शकता. त्यासोबत भाजलेले हरभरे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.

रात्रीच्या वेळी तुमचा आहार हलका ठेवा, अन्यथा सकाळी उठल्यावर रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, यासाठी मल्टीग्रेन पीठ रोटी सॅलड, हिरव्या भाज्या आणि चिकन सूप फायदेशीर ठरू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com