Freeze Chilled Water Side Effects: तुम्हालाही उन्हातून आल्यानंतर फ्रीजमधले पाणी पिण्याची सवय आहे? जाणून घ्या तोटे

Summer Cold Drink Side Effects: उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी लोक लिक्विड ड्रिंक्सचे सेवन करतात.
Cold Water Side Effects
Cold Water Side EffectsSaam tv

Summer Care Tips: रखरखत्या उन्हातून घरी आल्यानंतर आपल्या हवे असते ते थंडगार काही तरी. अशातच आपण सरळ फ्री किंवा माठातले थंडगार पाणी पितो. काही क्षणापर्यंत आपल्याला त्यातून आराम मिळतो. उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी लोक लिक्विड ड्रिंक्सचे सेवन करतात, ज्यामध्ये सामान्य पाण्याबरोबरच लोक लस्सी, ज्यूस आणि नारळाच्या पाण्यासह विविध प्रकारचे पेये खातात.

तज्ज्ञांच्या मते, हायड्रेटेड राहण्यासाठी किमान आठ ते दहा ग्लास पाणी (Water) पिणे अत्यंत आवश्यक आहे. पाणी पिताना योग्य तापमान असणे देखील आवश्यक आहे. पाण्याच्या तापमानाचा आरोग्यावर (Health) परिणाम होतो. उन्हाळ्यात थंड पाणी प्यावेसे वाटते म्हणून लोक फ्रीजचे पाणी पितात. तहान शमवण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी लोक कधीही थंड पाणी पितात, यामुळे उष्णतेपासून काही काळ आराम मिळत असला तरी त्यामुळे खूप नुकसानही होते.

Cold Water Side Effects
Summer Skin Care : उन्हाळ्यात चेहरा लाल का पडतो ? घराबाहेर पडण्याआधी या सोप्या टिप्स फॉलो करा

आयुर्वेदात थंड पाणी आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सांगितले आहे. विशेषतः फ्रीजचे थंडगार पाणी अजिबात पिऊ नये. तुम्हीही उन्हाळ्यात चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने थंड पाण्याचे सेवन करत असाल तर जाणून घ्या तुमच्या आरोग्याला होणारे नुकसान.

1. पचनक्रियेवर होणारा परिणाम

बाहेरुन आल्यावर लगेच थंड पाणी प्यायल्याने आपली पचनक्रिया मंदावते. तसेच अपचनाच्या समस्येला देखील सामोरे जावे लागते. पोटात थंड पाण्याचा पचनसंस्थेवर परिणाम होतो. संशोधनानुसार, थंड पाणी रक्तवाहिन्या आकुंचन पावते, ज्यामुळे पाचन समस्या उद्भवतात.

Cold Water Side Effects
Age Difference between Couples : बायकोपेक्षा- नवरा वयाने किती मोठा असावा ?

2. घसा खवखवणे

थंड पाणी प्यायल्याने घसा खवखवतो. फ्रीजमधले थंड पाणी प्यायल्यानंतर असा त्रास होणे सामान्य गोष्ट आहे. जेवणानंतर थंड पाणी प्यायल्यास श्लेष्मा तयार होऊ लागतो आणि श्वासोच्छवासाचा मार्ग बंद होतो. त्यामुळे घसा खवखवणे, श्लेष्मा, सर्दी आणि घसा सूज येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

3. हृदयाच्या गतीवर परिणाम

थंड पाण्याच्या सेवनाने शरीरातील हृदय गती देखील कमी होऊ शकते. अभ्यासानुसार, फ्रिजमधलं थंड पाणी जास्त प्यायल्याने दहावी क्रॅनियल नर्व्ह (व्हॅगस नर्व्ह) उत्तेजित होते. शरीरातील अनैच्छिक कार्ये नियंत्रित करण्याचे काम नसा करतात. कमी तापमानाच्या पाण्याचा परिणाम थेट वॅगस मज्जातंतूवर होतो, ज्यामुळे हृदय गती कमी होते.

Cold Water Side Effects
Weight And Height Calculate : वयानुसार किती असायला हवे आपले वजन?

4. डोकेदुखीचा त्रास

खूप थंड पाणी किंवा बर्फाचे पाणी प्यायल्यास मेंदू फ्रीझ होऊ शकतो. थंड पाण्याचे सेवन केल्याने तुमच्या मणक्यातील अनेक नसा थंड होऊ शकतात, ज्यामुळे मेंदूवर परिणाम होतो आणि डोकेदुखी (Headache) होऊ शकते. ही परिस्थिती सायनसच्या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी समस्या वाढवू शकते.

5. वजन कमी करण्यात समस्या

ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे त्यांनी थंड पाण्याचे सेवन करू नये. थंड पाण्यामुळे शरीरातील चरबी जाळणे कठीण होते. फ्रीजच्या पाण्याने शरीरातील चरबी घट्ट होते, त्यामुळे चरबी कमी होण्यात समस्या निर्माण होते आणि वजन कमी होत नाही.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com