Hypersomnia Causes: रात्री 8 तासांची झोप घेऊनही दिवसा झोप येते ? असू शकतो हा गंभीर आजार

Hypersomnia Symptoms: असे म्हटले जाते की चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. म्हणूनच 8 तासांची झोप खूप महत्त्वाची आहे.
Hypersomnia
HypersomniaSaam Tv

Hypersomnia Treatment: आपण आजारी पडल्यानंतर आपल्याला डॉक्टर पुरेशी झोप घेण्याचा सल्ला देतात. असे म्हटले जाते की चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. म्हणूनच 8 तासांची झोप खूप महत्त्वाची आहे.

पण असे काही लोक आहेत जे 8 ते 9 तासांची झोप घेत असतानाही दिवसभरात झोप घेतात. काहींना दुपारी झोप घेण्याची सवय आहे. परंतु, पुरेशी झोप घेऊनही तुम्हाला दिवसाही झोप येत असेल तर तुम्ही हायपरसोमनिया सारख्या आजाराने (Disease) ग्रस्त असू शकतात.

Hypersomnia
Oversleeping : कुंभकर्णासारखी झोपण्याची सवय आरोग्याला अधिक हानिकाराक, जास्त विश्रांती घेणे पडेल महागात !

हायपरसोमनिया असलेल्या लोकांना कामावर किंवा गाडी चालवताना कधीही झोप येऊ शकते आणि त्यांना उठतानाही खूप त्रास होतो. अशा लोकांना झोपेशी संबंधित इतर समस्या देखील असू शकतात, जसे की उर्जेची कमतरता, विचार करण्यात अडचण.नॅशनल स्लीप फाउंडेशननुसार, 40 टक्के लोकांमध्ये वेळोवेळी हायपरसोमनियाची काही लक्षणे (Symptoms) दिसून येतात.

1. हायपरसोमनियाची लक्षणे

  • जास्त झोप येणे.

  • दिवसातून अनेक वेळा (Time) झोपणे

  • 9 तासांपेक्षा जास्त झोप घेतल्यानंतरही थकल्यासारखे वाटणे

  • झोपेतून जागे होण्यात अडचण

  • झोपेतून उठण्याचा प्रयत्न करताना गोंधळून जाणे

  • झोपेनंतर अस्वस्थ वाटणे

  • विचार करणे किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण

Hypersomnia
Over Sleeping Problem : रात्रीची झोप घेतल्यानंतरही तुम्हाला दिवसा झोप का येते ? असू शकते गंभीर समस्या

2. हायपरसोम्नियाची कारणे

  • रात्री पुरेशी झोप न मिळणे

  • ड्रग्ज किंवा अल्कोहोलचा अतिवापर

  • जास्त वजन असणे

  • ही समस्या आनुवंशिकतेमुळे देखील असू शकते.

  • नैराश्यामुळे हायपरसोम्निया होऊ शकतो

  • मानसिक विकार (Mental Health)

  • चिंता

  • द्विध्रुवीय विकार

  • अल्झायमरसारख्या गोष्टींमुळे हायपरसोम्नियाचा धोका वाढतो

Hypersomnia
Sleeping Mistakes : तुम्हीही रात्री आळशीपणामुळे लाईट बंद करायला विसरता का? जाणून घ्या तोटे

3. हायपरसोमनिया टाळण्यासाठी काय करावे ?

  • हायपरसोमनियाचे योग्य उपचार मनोचिकित्सकडे जाऊन केले पाहिजेत. याशिवाय आपल्या आहाराचीही विशेष काळजी घ्यावी.

  • इच्छाशक्ती बळकट करण्यासाठी ध्यान आणि शारीरिक क्रियाकलाप देखील आवश्यक आहेत. कॅफिन आणि निकोटीनपासून अंतर ठेवा.

  • रात्री झोपताना आवाज आणि प्रकाशापासून अंतर राखणे आवश्यक आहे.

  • त्याच्या उपचारांसाठी रक्त तपासणी, सिटी स्कॅन, पॉलिसोमनोग्राफी नावाची स्लिप चाचणी आणि इतर काही आवश्यक चाचण्या सुचवू शकतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com