
Protein Rich Foods For An Energy Boost : अनियमित जीवनशैली, व्यस्त वेळापत्रक, जास्त वेळ स्क्रीन टाइम आणि झोपेची काम करतात यामुळे अनेकांना थकवा जाणवतो. जर तुम्हाला पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही सकाळी थकवा जाणवत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका.
नेहमीअशक्त वाटण्याचे लक्षण आढळण्यास त्यामागे काही कारणे असू शकतात. अशक्तपणा आणि थकवा कसा दूर करायचा? पोषणतज्ज्ञ अंजली फेसवानी यांनी थकवा येण्याचे कारण म्हणजे आहारात पोषकतत्वाची कमी असू शकते.
तुमच्या आहारात (Food) प्रोटीन कॅल्शियम, आयन, फायबर यासारख्या आवश्यक पोषकतत्त्वांनी समृद्ध आहार घेणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया पोषकतत्वांनी भरपूर असा आहार ज्यामुळे तुमचा थकवा आणि अशक्तपणा दूर करू शकता.
1. अंडी (Eggs)
शरीराला आवश्यक पोषकघटक अंड्यामध्ये असतात. त्यामुळे अंडीचा समावेश तुमच्या आहारात करणे गरजेचे आहे. प्रथिने, कॅल्शियम, निरोगी चरबी हे गुणधर्म अंड्यात उपलब्ध असतात. जेणकरून अंडी खाल्याने शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे तुम्ही अंडीपासून वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकता. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
2. केळी (Banana)
केळी या फळामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि पोटॅशियम हे गुणधर्म जास्त प्रमाणात असतात. दीर्घ व्यायाम करण्यासाठी केवळ एक केळ खाऊन पुरेशी ऊर्जा मिळते. त्यामुळे व्यायाम करण्याआधी केळी खाणे गरजेचे आहे.
4. टरबूज
पाणी , व्हिटॅमिनस आणि खनिजे यांचा उत्तम स्रोत म्हणजे टरबूज आहे. त्यामुळे टरबूजचे आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात. डिहायड्रेशनमुळे थकवा जाणवतो त्यामुळे टरबूज शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणून थकवा दूर करण्यासाठी तुम्ही टरबूजचे सेवन करू शकता.
5. ओट्स
ओट्स हा चविष्ट पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शरीरातील थकवा दूर करून शरीराला ऊर्जा देण्यासाठी ओट्स आवश्यक आहे. त्यामुळे साखरेसारखे परिष्कृत कार्बोहायड्रेट खाण्याऐवजी ओट्ससारख्या जटिल कर्बोदकांमधे स्रोत घ्या.
6. खजूर
शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी खजूर हा सर्वोत्तम पर्याय आहे. खजूरमध्ये कॅल्शियम,पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, जस्त आणि लोह यासारखे पोषकघटक उपलब्ध असतात. खजुरला पोषकतत्वांचे भांडार समजले जाते. त्यामुळेच खजूर निरोगी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.