Sunlight Side Effects: सूर्याच्या किरणांमुळे होते त्वचेला नुकसान ? जाणून घ्या तुमच्या त्वचेचा प्रकार !

Skin Care Tips: त्वचेच्या ऊतींना आतून निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी मदत करते. त्यासोबतच शरीरात कॅल्शियमचे प्रमाण वाढवते.
Skin Care Tips
Skin Care TipsSaam Tv

Health Tips : शरीरासाठी व्हिटॅमिन डी महत्वाचे असते. शरीरासाठी व्हिटॅमिन डी मिळवण्याचा सर्वात मोठा स्त्रोत सूर्यप्रकाश असतो. त्वचेच्या ऊतींना आतून निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी मदत करते. त्यासोबतच शरीरात कॅल्शियमचे प्रमाण वाढवते.

सकाळचे कोवळे ऊन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. परंतु दुपारचा सूर्यप्रकाश त्वचेसाठी नुकसानदायक असू शकतो. अतिनील किरणांचा त्वचेवर नकारात्मक परिणाम होतो आणि त्वचेच्या (Skin) संबधित अनेक समस्या निर्माण होतात. तसेच आज आम्ही तुम्हाला त्वचेच्या वेगवेगळ्या प्रकारांनुसार युव्ही किरणांच्या संपर्कात आल्याने त्वचेचे कसे नुकसान होऊ शकते. हे जाणून घेऊया

Skin Care Tips
Skin Care Tips : बदलत्या हवामानात अशी घ्याल त्वचेची काळजी !

क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते , अल्टट्राव्हायोलेट किरणांचा परिणाम आरोग्यावर (Health) होऊन कर्करोग, वृद्धत्व, इन्फ्लेमेशन यांचा धोका जास्त वाढतो. इतकेच नाही तर, ज्यांची त्वचा गोरी आहे, ज्यांच्या शरीरावर तीळ आहेत, हिरवे, निळे, तपकिरी डोळे किंवा तपकिरी केस आहेत अशा लोकांना अतिनील किरणांचा धोका अधिक असतो.

सूर्यकिरणांचा त्वचेनुसार होणारे परिणाम

1. डार्क स्किन टोन

ज्या लोकांची डार्क स्किन (Dark Skin) आहे त्यांची त्वचा अतिनील किरणांच्या संपर्कात येण्याची शक्यता असते. डार्क स्किनवर सूर्यप्रकाशाचा परिणाम होऊन त्वचेचा कर्करोग, वृद्धत्वाचा धोका निर्माण होतो. एका संशोधनातून असे समोर आले आहे की, डार्क स्किन ऍक्रल लेंटिगिनस मेलेनोमासाठी संवेदशील असते आणि नखांच्या खाली किंवा तळपायावर त्वचेच्या कर्करोगाचे अतिशय भयंकर लक्षण विकसित होऊ शकते. त्याचबरोबर तळहातावर देखील कर्करोगाचे (Cancer) लक्षण विकसित होऊ शकते.

Skin Care Tips
Soft And Glowing Skin : त्वचेला सॉफ्ट आणि ग्लोविंग बनवण्यासाठी 'या' गोष्टी नक्की वापरून पहा

2. तेलकट त्वचा

सूर्यप्रकाशामुळे तेलकट त्वचा लवकर ताणली जाते त्यामुळे तेलकट त्वचा (Oily Skin) असलेल्या लोकांनी जास्त उन्हात राहिल्यास त्वचेच्या समस्या निर्माण होतात. तसेच तेलकट त्वचेवर सूर्यप्रकाशामुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स वाढतात.

3. कोरडी त्वचा

कोरडी त्वचा (Dry Skin) अतिनील किरणांच्या संपर्कात आल्याने काही वेळात उग्र होते. परिणामी त्वचेवर सुरकुत्या , रेषा, कोरडेपणा वेगाने वाढतात. त्यामुळे जर तुमची त्वचा कोरडी असेल तर अतिनील किरणांच्या संपर्कात येण्याआधी त्वचेची योग्य काळजी घेणे गरजेचे असते.

Skin Care Tips
Skin Glowing Tips : ग्लोविंग त्वचेसाठी फायदेशीर ठरेल तुळशीच्या पानांचा नॅचरल टोनर!

4. सेन्सिटिव्ह स्किन

सेन्सिटिव्ह स्किनला (Sensitive Skin) अतिनील किरणांचा सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो. सेन्सिटिव्ह स्किन अतिनील किरणांच्या संपर्कात आल्याने त्वचेवर पुरळ उठणे, त्वचा लाल पडणे, खाज सुटणे, त्वचेवर जळजळ होणे या समस्या निर्माण होतात. त्यामुळे या त्रासापासून दूर राहण्यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने सनस्क्रीनचा वापर करणे गरजेचे आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com