Skin Care : वयाची 40 वी ओलांडल्यानंतरही सुष्मिता सेन दिसते तरुण,अशी घेते त्वचेची काळजी

सुष्मिता सेन सध्या 47 वर्षांची आहे, परंतु तिला पाहून वयाचा अंदाज लावणे कठीण होते.
Skin Care
Skin CareSushmita Sen Photo
Published on

भारतातून मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणारी पहिली महिला आणि बॉलिवूड अभिनेत्री, सुष्मिता सेन सध्या 47 वर्षांची आहे, परंतु तिला पाहून वयाचा अंदाज लावणे कठीण होते.

आजही तिने सौंदर्यात अनेक तरुण अभिनेत्रींना मागे सोडले आहे. तुम्हालाही वयाच्या 40 शी नंतर ही तुम्हाला 25 शी सारखे दिसायचे असेल तर काही खास गोष्टी फॉलो करा.

Skin Care
Winter Skin Care : या कारणांमुळे थंडीत वाढतो सोरायसिसचा त्रास, अशी घ्या काळजी

जर तुम्हाला कोणत्याही मेकअपशिवाय सुंदर आणि तरुण दिसायचे असेल, तर तुम्हाला नेहमीच त्वचा हायड्रेट ठेवावी लागेल, म्हणजेच पुरेसे पाणी प्यावे लागेल. बहुतेक तज्ज्ञ दिवसातून किमान 8 ग्लास पाणी पिण्याची शिफारस करतात.

जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात केमिकलवर आधारित हेअर प्रोडक्ट्स वापरत असाल तर फायद्याऐवजी नुकसान होऊ लागते. चमकदार त्वचा मिळविण्यासाठी नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करणे चांगले. अनेक त्वचा निगा तज्ज्ञ चेहऱ्यावर बेसन आणि मलईची पेस्ट लावण्याची शिफारस करतात.

त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी तुम्हाला महागडी क्रीम लावण्याची गरज नाही आणि त्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल, खोबरेल तेल, कच्च्या मोहरीचे तेल इत्यादी नैसर्गिक तेलांचाही वापर करू शकता.

निरोगी आहाराशिवाय, आपण आपली त्वचा सुधारू शकत नाही. सर्वप्रथम, तेलकट आणि गोड पदार्थ शक्यतो टाळा. याशिवाय फळे आणि भाज्यांना प्राधान्य द्या. विशेषतः लिंबूवर्गीय फळे तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com