Vitamin C Side Effects : जास्त प्रमाणात 'जीवनसत्त्व क' चे सेवन ठरु शकते आरोग्याला हानिकारक !

जीवनसत्त्व क च्या वाढत्या प्रमाणामुळे तुम्हाला किडनी आणि हाडांमधील समस्या उद्भवतात.
Vitamin C Side Effects
Vitamin C Side EffectsSaam Tv

Vitamin C Side Effects : जीवनसत्त्व क आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक असते. जीवनसत्त्व क च्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक प्रकारचे आजार उद्भवतात. अशातच तुम्ही जीवनसत्त्व क चे जास्त प्रमाणात सेवन केले तर तुमच्या आरोग्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. जीवनसत्त्व क च्या वाढत्या प्रमाणामुळे तुम्हाला किडनी आणि हाडांमधील समस्या उद्भवतात.

आपल्या शरीराला जीवनसत्त्व क चे भरपूर फायदे होणार आहेत. असं समजून बरेच लोक जीवनसत्त्व क जास्त प्रमाणात शरीरामध्ये घेतात. जीवनसत्त्वाच्या फायद्यामुळे जास्त प्रमाणात शरीरामध्ये जीवनसत्त्व क असल्याने तुमच्या शरीराला ते घातक ठरू शकते.

शरीरातील जीवनसत्त्व (Vitamins) कच्या जास्त प्रमाणामुळे शरीरामध्ये काही साईड इफेक्ट दिसू लागतात. आम्ही तुम्हाला आज असे लक्षणे सांगणार आहोत. ज्यामध्ये जीवनसत्त्व कच्या वाढत्या प्रमाणाचे दुष्परिणाम होऊ शकतात.

Vitamin C Side Effects
Vitamin-C Foods : 'क' जीवनसत्त्वांची कमतरता जाणवतेय ? आहारात आजच सामील करा 'हे' 5 पदार्थ

1. किडनी स्टोन

प्रमाणापेक्षा जास्त जीवनसत्त्व क फूडचे (Food) सेवन केल्याने तुम्हाला किडनी स्टोनचा आजार होऊ शकतो. कारण की, शरीरात असलेले जास्तीचे जीवनसत्त्व क ऑक्सलेटच्या माध्यमातून लघवीच्या जागेवरून बाहेर पडते. परंतु बऱ्याचदा दुसऱ्या मिनरल्स सोबत छोटया छोटया क्रिस्टलच्या रुपात तयार होतात आणि किडनी स्टोन बनतात.

2. हाडांचा विकास न होणे

त्याचबरोबर हाडांमधील असामान्य विकासाचे कारण देखील जीवनसत्त्व क च्या जास्त प्रमाणामुळे होऊ शकते. जीवनसत्त्व कचे वाढते प्रमाण हे हाडांच्या असामान्य विकासामध्ये बोर्न स्पर्सचे कारण बनू शकते. ज्यामध्ये एक हड्डी विचित्र अवस्थेत बाहेर येऊ लागते. ही भरपूर दुखते आणि कमजोरी,थकवा अशी लक्षणे दिसू लागतात.

Vitamin C Side Effects
Vitamin C Side Effectscanva

3. पचनसंस्थेची समस्या

जीवनसत्त्व क च्या जास्त सेवनाने तुमच्या पचनसंस्थेवर आपत्ती येऊ शकते. विटामिन सी च्या जास्त सेवनामुळे पचनसंस्था खराब होते. यामुळे अपचन, पोटदुखी, छातीमध्ये जळजळ होणे अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात. त्याचबरोबर बरेच लोक जीवनसत्त्व क च्या गोळ्या खातात. शरीरामधील जास्त जीवनसत्त्व क चे प्रमाण वाढले आहे हे लक्षात येताच वेळीस सावधान होऊन जीवनसत्त्व क च्या गोळ्या बंद करणे हे अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

4. शरीराचे असंतुलित पोषण

मानवी शरीराने जीवनसत्त्व क जास्त प्रमाण घेतल्यास शरीरामधील पोषक तत्वांचा स्तर असंतुलित होऊन जाते. अशामुळे शरीरातील जीवनसत्त्व बी 12 कॉपरचे प्रमाण कमी होते. मानवी शरीर स्वतःहून जीवनसत्त्व कचे उत्पादन करू शकत नाही. यासाठी आपल्याला बाहेरील जीवनसत्त्व क सप्लीमेंटची गरज भासते. त्याचबरोबर कुठल्या वयोगटातील महिलांनी (Women) आणि पुरुषांनी किती प्रमाणात जीवनसत्त्व क सप्लीमेंटचे सेवन करावे. हे जाणून घेऊया

वय पुरुष महिला

1-3. 15 एमजी. 15 एमजी

4-8. 25एमजी 25 एमजी

9-13. 45एमजी 45 एमजी

14-18. 75एमजी 65एमजी

19+वय 90 एमजी 75एमजी

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com