Food For Healthy Lungs : सतत जळजळ होतेय ? फुफ्फुसांचा त्रास होतोय? या निरोगी आहारांचा समावेश करा

फुफ्फुसांची काळजी कशी घ्याल ?
Food For Healthy Lungs
Food For Healthy LungsSaam Tv

Food For Healthy Lungs : शरीरासोबतच आपल्याला इतर इंद्रियांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यातील फुफ्फुसांचे नियमितपणे डिटॉक्सिंग करत राहणे महत्त्वाचे आहे.

कोरोना महामारीनंतर फुफ्फुसांचे आरोग्य जपणे अधिक महत्त्वाचे आहे. तसेच हवेतील विरघळलेल्या प्रदूषणामुळे श्वासोच्छवासाच्या समस्या दिवंसेदिवस वाढत आहे.

Food For Healthy Lungs
Health Alert : वर्कआउट करताय? काळजी घ्या, अन्यथा होऊ शकतो शरीरावर विपरीत परिणाम

श्वासोच्छवासाचा त्रास खूप वाढतो तेव्हा बहुतेक लोकांच्या लक्षात येते. फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी श्वासोच्छवासाच्या व्यायामाबरोबरच आहाराकडे लक्ष देणे योग्य ठरेल.

जेव्हा वायुमार्ग सुजतात तेव्हा श्वास घेणे कठीण होते आणि छाती जड होऊन बंद होते. अशावेळी आपण या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा.

१. हळद

Turmeric
Turmeric Canva

हळदीत (Turmeric) कर्क्युमिन असते ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. ज्यामुळे छातीतील जळजळ आणि घट्टपणा कमी करण्यास मदत होते. हे फुफ्फुसांचे कार्य सुधारून अनेक प्रकारचे श्वसन रोग बरे करण्यास मदत करते.

२. अक्रोड-

Walnut
WalnutCanva

अक्रोडमध्ये ओमेगा -३ फॅटी ऍसिड आढळते. ज्यामुळे फुफ्फुसाची जळजळ कमी होण्यास मदत होते. दररोज मूठभर अक्रोड खाल्ल्याने दीर्घकालीन श्वसनाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

३. लसूण

Garlic
Garlic Canva

लसणात अॅलिसिन अँटीबायोटिक कंपाऊंड असते. जे फुफ्फुसात कोणत्याही प्रकारचे संक्रमण असल्यास काढून टाकण्यास मदत होते ज्यामुळे श्वास घेण्यात अडचण येते. लसूण हा नैसर्गिक घटक आहे. त्यातील अँटिऑक्सिडंट गुणधर्म फुफ्फुसाची जळजळ कमी करतात.

४. ग्रीन टी

Green Tea
Green TeaCanva

ग्रीन टी प्यायल्याने घसा आणि छातीत जमा झालेला कफ बर्‍याच प्रमाणात दूर होतो. त्याच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे, ते फुफ्फुसाची जळजळ कमी करण्यास मदत करते.

५. पाणी

Water
WaterCanva

कोरड्या फुफ्फुसात सतत जळजळ होण्याची शक्यता असते. दररोज कोमट पाणी (Water) प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि श्लेष्मा कमी होण्यास मदत होते. याशिवाय पालेभाज्या, बीन्स, मसूर, आले, लिंबूवर्गीय फळे, कांदे, जवस यांचाही आहारात समावेश करा भाग बनवा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com