Friendship Day 2022 in India : मैत्रीदिन ऑगस्टच्या पहिल्या रविवारी का साजरा केला जातो ?

भारत आणि मलेशियात ऑगस्टच्या पहिल्या रविवारी हा दिवस का साजरा केला जातो.
Happy friendship day 2022
Happy friendship day 2022ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आंतराष्ट्रीय मैत्री दिवस हा ३० जुलै ला जागतिक स्तरावर साजरा केला जातो, परंतु हा दिवस भारतात ऑगस्टच्या (August) पहिल्या रविवारी साजरा केला जातो.

हे देखील पहा -

आपल्या प्रत्येकाला आपल्या आयुष्यात विश्वासाच, प्रेमाच, आपल्या सुख-दु:खात कुणी तरी हव असत. मैत्री हे एक असे नाते आहे ज्याचा धागा आपल्याला स्वत: विणावा लागतो.

मैत्री ही जगातील सर्वात सुंदर, मौल्यवान आणि निःस्वार्थ बंधनांपैकी एक आहे. आपण आपले सर्व क्षण मित्रांसोबत शेअर करतो, मग ते आनंदाचे असोत किंवा दुःखाचे. हे अगदी बरोबर म्हटले जाते की मित्र हे आपले विस्तारित कुटुंब आहे कारण आपण त्यांची निवड करतो. जेव्हा कधी आपल्याला कमीपणा वाटतो आणि रडण्यासाठी खांद्याची गरज असते तेव्हा आपल्या मनात येणारा पहिला माणूस खरा मित्र (Friends) असतो.

Happy friendship day 2022
International friendship day 2022 : मैत्री दिन का साजरा केला जातो ? जाणून घ्या त्याचा इतिहास

माणूस कितीही यशस्वी झाला तरी प्रत्येकाला मित्राची गरज असते. फ्रेंडशिप डे हा आपल्या मित्रांचा सन्मान, आदर आणि प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी साजरा केला जातो जेणेकरून त्यांना विशेष वाटावे आणि आपल्या जीवनात त्यांची उपस्थिती स्वीकारावी. हा दिवस ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी साजरा केला जातो. यंदा हा दिवस ७ ऑगस्ट २०२२ रोजी साजरा केला जाईल.

फ्रेंडशिप डेची कल्पना सर्वप्रथम जॉयस हॉल (हॉलमार्क कार्ड्सचे संस्थापक) यांनी १९३० मध्ये मांडली होती. त्यापूर्वी ग्रीटिंग कार्ड नॅशनल असोसिएशनने १९२० मध्ये ग्रीटिंग कार्डची विक्री वाढवण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून या संकल्पनेला चालना देण्याचा प्रयत्न केला. लोकांना ते कळले आणि संकल्पना फोल ठरली. पुढे १९५८ मध्ये वर्ल्ड फ्रेंडशिप क्रुसेडनेही ही कल्पना मांडली, पण ती यशस्वी झाली नाही. शेवटी, २०११ मध्ये, संयुक्त राष्ट्र संघाने ३० जुलै हा जागतिक मैत्री दिन म्हणून घोषित केला. तेव्हापासून विविध देश वेगवेगळ्या तारखांना फ्रेंडशिप डे साजरा करत आहेत. भारतात हा दिवस ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा करतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com