China 'Fall in love' Vacation : सुट्टी घ्या अन् प्रेम करा; चीनमध्ये विद्यार्थ्यांना आठवडाभर तर नवविवाहितांची महिनाभर मज्जा

China Colleges Vacation For Love : चीन सरकार तेथील नागरिकांसाठी निरनिराळ्या योजना आखत असते. त्यांच्यासाठी नवनवीन सुविधा देत असते.
China 'Fall in love' Vacation
China 'Fall in love' VacationSaam Tv

China Population Crisis : भारतात तरुणांना खुल्लेआम प्रेम करण्यावरच नाही तर त्याविषयी बोलण्यावर सुद्धा बंधन आहे. बदलेल्या काळानुसार आजही प्रेम लपून छपूनच केले जाते. मुलं तरुण वयात आल्यानंतरही आपल्या नात्याबद्दल जगासमोर लगेच उघडपणे बोलत नाही.

याबाबत कितीही चर्चा केली तरीही याच्या वादात सापडणारे काही कमी नाही. दुसरीकडे, जगातील (World) सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देश चीनमध्ये मुलांच्या जन्मदरात मोठी घसरण झाली आहे, तिथले सरकार आता लोकांना अधिक मुले (Child) होण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.

China 'Fall in love' Vacation
Relationship Tips : 'या' 5 गोष्टी ज्या कधीही तुमच्या जोडीदाराला सांगू नका !

चीन (China) सरकार तेथील नागरिकांसाठी निरनिराळ्या योजना आखत असते. त्यांच्यासाठी नवनवीन सुविधा देत असते. सध्या चीन हा घटत्या जन्मदराचा सामना करत आहे. येणाऱ्या काळात ही घटना राष्ट्रीय आपत्ती बनू नये, अशी त्यांना भीती वाटत आहे.

यासाठी तेथील जन्मदर वाढवण्यासाठी चीन सरकार नवनवीन निर्णय लागू करत आहे. सरकारच्या राजकीय सल्लागारांनी जन्मदर वाढवण्यासाठी अनेक शिफारशी केल्या आहेत. या शिफारशींचे समर्थन करून, चीनमधील अनेक महाविद्यालयांनी (Collage) एक अनोखी योजना सुरू केली आहे. या योजनेला स्प्रिंग ब्रेक असे नाव देण्यात आले आहे.

China 'Fall in love' Vacation
Relationship Tips : कधी चॅटवर तर, कधी मेसेजवर सेक्सटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या 'या' इमोजींचा अर्थ काय ?

रिपोर्ट्सनुसार, अनेक कॉलेज विद्यार्थ्यांना त्यांचा प्रेमाचा शोध पूर्ण करण्यासाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुट्टी देत आहेत. NBC न्यूजनुसार, मियायांग फ्लाइंग व्होकेशनल कॉलेज, फॅन मेई एज्युकेशन ग्रुपद्वारे चालवल्या जाणाऱ्या नऊ महाविद्यालयांपैकी एक, 21 मार्च रोजी प्रथम स्प्रिंग ब्रेकची घोषणा केली. ज्यामध्ये विद्यार्थांना विशेषत: त्यांचा प्रेमाचा शोध पूर्ण करण्यास सांगितले होते.

त्याचप्रमाणे उर्वरित महाविद्यालयांनाही १ एप्रिल ते ७ एप्रिलदरम्यान सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना "निसर्गावर प्रेम करा, जीवनावर प्रेम करा आणि स्प्रिंग ब्रेकचा आनंद घ्या" असे प्रोत्साहन दिले जात आहे.

मियांग फ्लाइंग व्होकेशनल कॉलेजचे डेप्युटी डीन लियांग गुओहुई यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, मला आशा आहे की विद्यार्थी त्यांच्या प्रेमाचा आनंद घेऊ शकतो. तेथील सरकारचे असे म्हणणे आहे की, वसंत ऋतुचा आनंदही घेऊ शकतील. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करता येतील. ज्यामुळे ते पुन्हा कॉलेजला येतील तेव्हा त्यांची शैक्षणिक क्षमता वाढेल.

China 'Fall in love' Vacation
Physical Relationship : लैंगिक संबंध अधिक सुरक्षित करण्यासाठी कंडोमशिवाय 'या' गोष्टींची देखील घ्या काळजी, अन्यथा पडेल महागात !

1. या सुट्यांमध्येही गृहपाठ

महाविद्यालयांनी या सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांना गृहपाठही दिला आहे. या कालावधीत त्यांना त्यांचा अनुभव व काम डायरीत मांडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यात वैयक्तिक विकास आणि प्रवासाचे व्हिडिओ बनवणे देखील समाविष्ट आहे. रॉयटर्सच्या मते, सरकारच्या सूचनेनुसार कॉलेज प्रशासनाचे हे प्रयत्न जन्मदर वाढवण्याचे मार्ग शोधून प्रेरित आहेत.

2. 20 पेक्षा जास्त शिफारशी

चीनी सरकारने जन्मदर वाढवण्यासाठी 20 पेक्षा जास्त शिफारसी आणल्या आहेत, जरी तज्ञ म्हणतात की ते लोकसंख्या घट कमी करू शकतात.

3. वन चाइल्ड पॉलिसी

1980 ते 2015 दरम्यान लागू करण्यात आलेल्या वन चाइल्ड पॉलिसीसह चीनने मुख्यत्वे लोकसंख्या नियंत्रणावर लक्ष केंद्रित केले.

China 'Fall in love' Vacation
Physical Relationship : वाढते वय नाही तर, 'या' 8 कारणांमुळे लैंगिक क्षमता होतेय कमी, जाणून घ्या

2021 मध्ये घटत्या लोकसंख्येमुळे बॅकफूटवर आलेल्या सरकारच्या सूचनेनुसार अधिकाऱ्यांनी मुलांची कमाल मर्यादा तीनपर्यंत वाढवली. परंतु, नोकरी नसणे, कमी पगार आणि एकमेकांना वेळ न देणे यामुळे चिनी लोक मुले जन्माला घालण्यास कचरत असल्याची परिस्थिती आहे.

चीनमधील अनेक स्थानिक कंपन्या, प्रांत आणि टाउनशिप देखील लोकांना लग्न लावण्याचे प्रयोग करत आहेत. काही कंपन्या ३० दिवसांची रजा देत आहेत तर काहींनी शहरातील महिलांना ग्रामीण भागातील वृद्ध पदवीधरांना डेट करण्यास सांगण्यासाठी मोहिमा सुरू केल्या आहेत.

सरकारसाठी ही देखील मोठी चिंतेची बाब आहे की, एक वर्षाहून अधिक काळ चाललेल्या कोरोना लॉकडाऊनच्या काळातही लोक घरात कैद असताना त्यांनी मुलांना जन्म देण्याचे टाळले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com