Government Scheme : नोकरी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे होणार मोठा फायदा

केंद्र सरकार लवकरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची (EPFO) बचत योजनेत मोठा बदल करणार आहे.
Government Scheme
Government SchemeSaam Tv

Government Scheme : तुम्हीही नोकरी करत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकार (Government) लवकरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची (EPFO) बचत योजनेत मोठा बदल करणार आहे. या नव्या निर्णयानंतर कर्मचारी आणि नियुक्त दोघांनाही पूर्वीपेक्षा जास्त योगदान द्यावे लागणार आहे. सरकारच्या या निर्णायामुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती निधीत लक्षणीय वाढ होणार आहे. या निर्णयानंतर पूर्वीपेक्षा जास्त कर्मचारी भविष्य निर्वाह निधी जमा होईल.

याआधी 2014 मध्ये झाला होता बदल

सध्या, EPFO ​​च्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेसाठी वेतन मर्यादा 15,000 रुपये प्रति महिना आहे. त्यात आठ वर्षांपूर्वी 2014 मध्ये बदल करण्यात आला होता. त्यावेळी ती दरमहा 6,500 रुपयांवरून 15,000 रुपये करण्यात आली होती. अशी कंपनी किंवा कारखाना जिथे 20 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत, त्यांना नियमानुसार कर्मचाऱ्यांचा पीएफ जमा करावा लागतो.

Government Scheme
TRAI Guideline : खुशखबर ! टीव्ही पाहणे होणार स्वस्त; ट्रायने जारी केले नवे नियम, होतील 'या' तारेखेपासून लागू

पगार मर्यादा वाढवण्याबाबत लवकरच निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, पगार (Salary) मर्यादेत वाढ करण्याबाबत तज्ज्ञ समिती लवकरच निर्णय घेणार आहे. तो महागाईनुसार इंडेक्स केला जाईल असे सांगण्यात येत आहे. EPFO अंतर्गत कव्हरेजसाठी याचा वेळोवेळी आढावा घेतला जाईल. सूत्रांचे म्हणणे आहे की EPFO ​​अंतर्गत किमान वेतन मर्यादा 15000 वरून 21000 पर्यंत वाढवली जाईल.

पगार मर्यादेत वाढ झाल्याने कर्मचारी आणि नियोक्त्याने जमा केलेल्या पीएफचा हिस्सा वाढेल. आता 15000 रुपयांवर 1800 रुपये आहे, जर ते 21000 पर्यंत वाढवले ​​तर ते 2530 रुपये होईल. यामुळे भविष्यात तयार करण्यात येणारा पेन्शन फंड सध्याच्या निधीपेक्षा जास्त असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com