Government Schemes For Daughter
Government Schemes For DaughterSaam Tv

Government Schemes For Daughter : मुलींसाठी बेस्ट आहेत 'या' 5 सरकारी योजना, शिक्षणांपासून ते लग्नापर्यंतची चिंता नकोच !

देशातील मुलींना पुढे नेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक सरकारी योजना राबविण्यात येत आहेत.

Government Schemes For Daughter : मुलगी जन्माला आली की, अनेक पालकांना (Parents) चिंता वाटू लागते ती तिच्या भावी आयुष्याची. बदलेल्या काळानुसार हल्ली शिक्षण व इतर सगळ्याच गोष्टींच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे.

देशातील मुलींना पुढे नेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक सरकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजना देशातील मुलींच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेची विशेष काळजी घेतात. या सर्व योजनांमध्ये वेगवेगळे फायदे दिले जातात, ज्या अंतर्गत मुलींच्या शिक्षणापासून लग्नापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे.

Government Schemes For Daughter
Government Scheme : नोकरी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे होणार मोठा फायदा

यामध्ये पालकांना फारसा आर्थिक त्रास सहन करावा लागत नाही. या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करून पालक आपल्या मुलींचे भविष्य सुधारू शकतात. त्यामुळे त्यांना अधिक चिंता करण्याची गरज नाही. तसेच मुलीच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंत कोणताही त्रास न होणार नाही.

सरकारने (Government) अशाच काही योजना मुलींसाठी आणल्या आहेत. ज्याची आपल्यापैकी कुणालाच माहिती नसते. या पाच सरकारी योजनेच्या गुंतवणूकीबद्दल जाणून घेऊया. या योजनेमध्ये निश्चित उत्पन्न गुंतवून मुलीच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतचा खर्च उचलता येतो. या योजनांतर्गत सरकारकडून आर्थिक मदतही दिली जाते. यामुळे तुम्हाला जास्त आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. जाणून घ्या, कोणत्या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक कराल

1. सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना अल्पबचत योजनेंतर्गत ठेवण्यात आली आहे. सुकन्या समृद्धी योजनेत, मुलीच्या जन्मापासून ते 10 वर्षांपर्यंत पालकांच्या वतीने गुंतवणूक केली जाते. सरकार सध्या या योजनेवर 7.6 टक्के परतावा देत आहे आणि यामध्ये दरवर्षी किमान 250 रुपयापासून कमाल 1.5 लाख रुपये गुंतवता येतात. या योजनेत जन्मापासून १८ वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते आणि मुलीच्या लग्नापर्यंत मोठी रक्कम जमा करता येते.

Government Schemes For Daughter
Post Office Investment Schemes : पोस्ट ऑफिसच्या 'या' 4 योजनांचा लाभ घ्या, व्हाल करोडपती!

2. बालिका समृद्धी योजना

ही योजना सुकन्या समृद्धी योजनेसारखीच आहे, जी मुलीच्या जन्मानंतर 500 रुपये अनुदान देते. या योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडता येते. यामध्ये सरकारकडून गुंतवणुकीवर वार्षिक व्याज दिले जाते. यातील पैसे मुलगी १८ वर्षांची झाल्यावरच काढता येते.

3. सीबीएसई उडान योजना

मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत CBSE उडान योजना सुरू करण्यात आली. ही योजना मुलींसाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन शिक्षणाची सुविधा प्रदान करते. यासह, त्यांना अभ्यास सामग्रीसह प्रीलोडेड टॅब्लेट देखील दिले जातात, जेणेकरून ते त्यांच्या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेची तयारी पूर्ण करू शकतील.

4. मुख्यमंत्री लाडली योजना

झारखंड राज्याने मुख्यमंत्री लाडली योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत मुलीच्या नावावर पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात पाच वर्षांसाठी 6000 रुपये जमा केले जातात.

5. माझी कन्या भाग्यश्री योजना

महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेंतर्गत लाभार्थी मुलगी आणि तिच्या आईच्या नावाने राष्ट्रीय बँकेत संयुक्त खाते उघडले जाते आणि दोघांनाही 1 लाख रुपयांचा अपघात विमा आणि 5,000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट दिला जातो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com