Health Tips : इम्युन थ्रॉम्बोसायटोपीनिय म्हणजे काय ? याची लक्षणे स्त्रियांमध्ये अधिक दिसतात का ? तज्ज्ञ सांगताहेत कारण

रक्तातील प्लेटलेट्सची संख्या खूप कमी झाल्याने उद्भवणा-या या रक्ताचा हा आजार आहे.
Health Tips
Health TipsCanva

Health Tips : आपण सतत आजाराच्या नवानव्या गोष्टी बद्दल ऐकत असतो. जराशी झालेली दुखापत किंवा जखम ही पुढे जाऊन आपल्याला अधिक महागात पडू शकते.

जागतिक आयटीपी (इम्युन थ्रॉम्बोसायटोपीनिया) जागरुकता महिन्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अग्रगण्य आरोग्यकर्मींनी रक्तातील प्लेटलेट्सची संख्या खूप कमी झाल्याने उद्भवणा-या या रक्ताच्या या ऑटोइम्युन आजाराविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर भर देण्याची गरज आहे.

इम्युन थ्रॉम्बोसायोपीनिया (आयटीपी) या व्याधीचे प्रमाण दर १००,००० व्यक्तींमागे १.६ ते ३.९ इतके आहे. हा आजार होण्याची शक्यता वाढत्या वयासोबत वाढत जाते आणि स्त्रियांना (Women) तो होण्याची शक्यता काहीशी प्रबळ असते. ही एक दुर्धर व्याधी आहे व त्यासाठी रुग्णाला आयुष्यभर औषधोपचार सुरू ठेवावे लागतात.

Health Tips
Women's Health : रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रियांनी आपले आरोग्य कसे जपायला हवे ?

नवी मुंबई येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे कन्सल्टन्ट हिमॅटोलॉजिस्ट आणि हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट डॉ. प्रथमेश कुलकर्णी सांगतात, ITP हा रक्ताचा एक ऑटोइम्युन प्रकारातील आजार आहे, ज्यात शरीराची रोगप्रतिकारयंत्रणा प्लेटलेट्सना नष्ट करते. यामुळे प्लेटलेट्सची संख्या खूप कमी होते व परिणामी शरीराला जखमा होतात किंवा रक्तस्त्राव होतो.

Health Tips
Lumpy Virus : थांबा ! लम्पी आजार झालेल्या गायीचे दूध पितायं? तर आधी हे वाचा

या आजारामध्ये (Disease) रुग्णाला कुठे मार लागल्यास, आपटल्यास किंवा पडल्यास त्वचेखाली असलेल्या लहान लहान रक्तवाहिन्यांची हानी होते व ती जागा काळीनिळी पडल्यासारखी दिसते. बरेचदा यात चिंता करण्यासारखे काही नसते. पण सहजासहजी जखम होत असेल किंवा कोणत्याही आघाताशिवाय जखम होत असेल तर मात्र रक्तामध्ये गुठळी होणे किंवा एखादा रक्तदोष असे एखादे कारण त्याच्या मुळाशी असू शकते.

लहान मुलांच्या बाबतीत आयटीपी हा सर्वसाधारणपणे एक सौम्य स्वरूपाचा आजार असतो व तो आपोआपच बरा होतो. प्रौढ व्यक्तींना मात्र गंभीर स्थितीमध्ये उपचारांची गरज भासू शकते. अशा व्यक्तींच्या बाबतीत एकतर हा आजार बरा होऊ शकतो किंवा गंभीर रूप धारण करू शकतो. काही वेळा कोणतीही लक्षणे न जाणवणा-या व्यक्तीने रक्तघटकांची तपासणी करून घेतल्यावर प्लेटलेट्सची संख्या घसरल्याचे आढळून येऊ शकते. आजाराचे हे स्वरूप लक्षणविरहित असते. या आजाराच्या बाबतीत एक गोष्ट आमच्या अनेकदा निदर्शनास येते, ती म्हणजे प्लेटलेट्सच्या सतत बदलत राहणा-या संख्येमुळे रुग्ण हवालदिल होऊन जातात. ते सतत चाचण्या करून घेत राहतात आणि त्या चाचण्यांचे निष्कर्ष हाती आले की त्यानुसार स्वत: काहीबाही औषधे घेतात.

Health Tips
Pizza Causes : सावधान ! पिझ्झा खाताय ? त्याचे शौकिन असाल तर वेळीच थांबा, होऊन शकतो 'या' रोगाचा धोका

यामुळे या स्थितीच्या व्यवस्थापनामध्ये बाधा येते, काही वेळी स्थिती आणखी बिघडू शकते. तेव्हा या आजारात प्लेटलेट्सची संख्या कमी-जास्त होत राहते आणि त्यातील किरकोळ बदलांची काळजी करण्याची गरज नाही ही गोष्ट ITP च्या रुग्णांनी ध्यानात घेतली पाहिजे.

ग्लोबल हॉस्पिटल, मुंबई येथील कन्सल्टन्ट हिमॅटोलॉजी अँड बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट (BMT) डॉ. श्रीनाथ क्षीरसागर सांगतात, आयटीपी हा एक दीर्घकाळ बरा न होणारा आजार आहे, ज्यात रुग्णाला आयुष्यभर उपचार घेत रहावे लागतात.

प्लेटलेट्सची संख्या जितकी कमी तितकाच रक्तस्त्रावाचा धोका अधिक असतो. याखेरीज रुग्णांना जांभळट व्रण दिसणे (Purpura) चट्ट्यासारखे दिसणारे छोटे लहान ठिपके दिसणे, मासिक पाळीमध्ये खूप रक्त जाणे, थकवा आणि नाकातून रक्त येणे यांसारखी काही वेगळी लक्षणेही जाणवू शकतात. तसेच या स्थितीची काही लक्षणे ही इतर आजारांच्या लक्षणांसारखीही दिसू शकतात. आणि म्हणूनच योग्य निदानासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरते.

Health Tips
Cardiac Arrests : कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय? राजू श्रीवास्तव यांचीही मृत्युशी झुंज ठरली होती अपयशी

सर्वसाधारणपणे आयटीपीवरील उपचारांमध्ये तोंडावाटे घ्यायच्या औषधांचा समावेश होतो. गंभीर प्रकरणांमध्ये प्लेटलेट्स चढवावे लागतात आणि त्यांना इन्ट्राव्हेनस इम्युन ग्लोब्युलिन (IVIG) देण्याचा सल्ला दिला जातो.

तसे पहायला गेले तर आयटीपी ही काही प्राणघातक स्थिती नाही आणि या आजाराचे बहुतांश रुग्ण सर्वसामान्य आयुष्य जगतात. जीवनशैलीत काही बदल करून आणि योग्य उपचार घेऊन या आजाराचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता येते. काही प्रकरणांमध्ये रुग्णांना प्लेटलेट्सवर परिणाम करणारी काही विशिष्ट औषधे टाळण्याचा सल्ला दिला जातो. काही सौम्य प्रकरणांमध्ये केवळ नियमित देखरेख ठेवली जाते व लगेचच उपचार सुरू केले जात नाहीत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com