Home Hacks : घाईच्या वेळी कपडे झटपट कसे फोल्ड कराल? हा व्हिडिओ बघा, नक्कीच मदत होईल

दररोजच्या कामाच्या व्यापात आपली घाईगडबड होते त्यामुळे आपल्याला घराकडे सतत लक्ष देता येत नाही.
Home Hacks
Home HacksSaam TV

Home Hacks : दररोजच्या कामाच्या व्यापात आपली घाईगडबड होते त्यामुळे आपल्याला घराकडे सतत लक्ष देता येत नाही. कामाच्या व्यापामुळे बरेचदा आपले घर (Home) अस्वच्छ असते आणि त्यामुळे आपली व घरातील इतरांची सतत चिडचिड होते.

सुट्टीच्या दिवशी आपण येणाऱ्या आठवड्याचे पुरेपुर नियोजन करतो पण, आराम आणि काम याचा मेळ काही जमत नाही. कामाच्या गडबडीत आपले आपल्या कपाटाकडे विशेष लक्ष दिले जात नाही. त्यामुळे सकाळी कपड्यांच्या घडीपासून ते त्याच्या निवडीपर्यंत अनेक गोष्टीमुळे आपल्याला गडबडायला होते.

Home Hacks
Fashion tips : तरुणींनो, कॉलेजला जाताय तर या आउटफिट्सची चॉइस विचारात घ्या

आपले कपाट व्यवस्थित लावायचे असल्यास आपण काही सोप्या टिप्सची मदत घेतो पण आज आम्ही तुम्हाला एक अनोखा व्हिडिओ दाखवणार आहोत, ज्यामुळे तुमचे कपाट मिनिटांत साफ तर होईलच पण आपल्या कपड्याची घडी देखील त्यामुळे व्यवस्थित होईल. तसेच ही सवय आपण आपल्या मुलांदेखील लावू शकतो.

व्हिडिओमध्ये तरुण आपल्याला जीन्सची घडी घालताना दिसत आहे. पहिल्यांदा त्याने जीन्सला सरळ करुन टेबलावर ठेवले. जीन्सच्या वरच्या भागाला फोल्ड करुन त्याचा खालचा भाग त्याच्या आत घुसवला. मग त्याने जीन्सच्या (Jeans) दोन्ही बाजूना फोल्ड करुन त्यांची साइज छोटी करण्याचा प्रयत्न केला.

नंतर या तरुणांने शर्ट कसे फोल्ड करावे हे सांगितले. शर्टाची व हाताची बटणे व्यवस्थितरित्या लावून घेतली. शर्टाला एका बाजूने फोल्ड करुन त्याचे हात तसेच ठेवले. पुन्हा दुसऱ्या बाजून फोल्ड केले. त्यानंतर कॉलरच्या वरचा बाजूचा भाग फोल्ड करुन पुन्हा खालच्या बाजूचा भाग फोल्ड केला. दोन्ही हातांना फोल्ड करुन शर्टाचा आकार छोटा केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com