
Methods To Store Butter : पदार्थांची चव वाढवण्यासाठी भारतीय घरात तूप, लोण्यापेक्षा हल्ली बटरला जास्त महत्त्व दिले जाते. पराठा, सॅण्डविच असो किंवा पावभाजी. यात बटर नसेल तर पदार्थांची चव हवी तशी लागत नाही.
आपल्यापैकी अनेक भारतीय (India) गृहिणींना आठवड्याभराचे सामान एकादाच आणण्याची सवय असते. अशातच बटर हा देखील त्याचाच एक भाग आहे. फ्रीजमध्ये बटर ठेवल्यानंतर काहीकाळ त्याला नॉर्मल तापमानावर आणण्यासाठी कठीण होते. मग चाकू किंवा चमच्याचा वापर आपण करतो. अशातच जर तुम्ही बटर रोज खात असाल आणि तुम्हाला ते फ्रीजमध्ये न ठेवता स्टोर करायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय काही खास टिप्स (Tips)
1. फ्रीजचा वापर न करता कसे कराल स्टोर
बटर हे अनेक प्रकारे बनवले जाते. हा पदार्थ दुग्धजन्य (Milk) आहे जो सुमारे एक ते दोन आठवडे फ्रीजमध्ये राहू शकतो. यामध्ये सुमारे 80 टक्क्यांपर्यंत फॅट असते, त्यामुळे त्यात पाण्याचे प्रमाण खूपच कमी असते. यामध्ये काही प्रमाणात मीठ (Salt) घातल्यास अनेक जीवाणूंपासून संरक्षण करते आणि फ्रीजच्या बाहेर साठवण्यासाठी योग्य बनवते .
2. बटर ताजे कसे ठेवाल ?
बटरबाहेर ठेवण्यासाठी, आपण ते सामान्य तापमान असलेल्या ठिकाणी हवाबंद कंटेनरमध्ये ठेवू शकता. आपले स्वयंपाकघर जास्त गरम असल्यास, ते दुसऱ्या रुममध्ये ठेवा. यासाठी त्याला सूर्यकिरणांपासून लांब ठेवा.
3. अॅल्युमिनियम फॉइलचा वापर
बटर फ्रेश ठेवण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइलचा वापर खूप प्रभावी मानला जात असला तरी बटर कधीही जास्त काळ पॅक करून ठेवू नये. असे केल्याने ऑक्सिडेशनमुळे बटर खराब होण्याचा धोका अधिक असतो.
4. बटर रॅपर फेकून देऊ नका
थेट डब्यात ठेवण्यापेक्षा रॅपरमध्ये बटर साठवणे केव्हाही चांगले. फ्रिजच्या बाहेर ठेवलेले बटर हे अधिक काळ टिकते व ताजे ठेवण्यास सोपे जाते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.