Hyper Parenting : हायपर पॅरेंटिंगमुळे होतयं मुलाचं नुकसान, अशी घ्या मुलांची काळजी

तुम्ही तुमच्या मुलांवर जेवढे निर्बंध लादाल तेवढेच ते तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी हानिकारक ठरणार आहे.
Hyper Parenting
Hyper ParentingSaam Tv

Hyper Parenting : बदलेल्या जीवनशैलीनुसार प्रत्येक पालक आपल्या पद्धतीने मुलांची काळजी घेतात. काहींना घर व काम सांभाळून काळजी घ्यायची असते तर काही पालक हे घरीच राहून मुलांची काळजी घेतात.

बहुतांश आई-वडील आपल्या मुलांची काळजी घेतात. पण यांमधील काही पॅरेंट्स आहेत जे आपल्या मुलांची जरा जास्तच काळजी घेतात. तुम्ही तुमच्या मुलांला चुकीच्या रस्त्यावर जाण्यापासून रोखत असाल किंवा मुलांच्या आयुष्यातील निर्णय तुम्ही स्वतः घेत असाल तर, तुम्ही या गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.

Hyper Parenting
Parenting Tips : एकुलत्या एका मुलांचे संगोपन करताना 'या' चुका करु नका, होतोय त्यांच्या मानसिकतेवर परिणाम

तुम्ही तुमच्या मुलांवर जेवढे निर्बंध लादाल तेवढेच ते तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी हानिकारक ठरणार आहे. आई वडिलांच्या या वागण्याला "हायपर पॅरेंटिंग" या नावाने ओळखले जातं. हायपर पेरेंटिंग नेमकं काय असतं. आणि त्यामुळे कोणत्या हानिकारक गोष्टी होऊ शकतात हे जाणून घेऊया.

हायपर पॅरेंटिंग म्हणजे काय ?

हायपर पॅरेंटिंग म्हणजे जे पालक आपल्या मुलाचे सगळे निर्णय स्वतःच घेतात. पालक आपल्या मुलाची सगळ्या गोष्ट पडताळून पाहतात आणि त्यानुसार त्याला मार्गदर्शन करतात. काही पालक तर त्यांच्या मुलांच्या भविष्याला घेऊन फारच चिंतीत असतात. यालाच हायपर पॅरेंटिंग किंवा हेलिकॉप्टर पॅरेंटिंग असं म्हटल जातं.

Hyper Parenting
Hyper ParentingCanva

हायपर पॅरेंटिंगचा मुलांवर कसा परिणाम होतो ?

1. आत्मविश्वास कमी होणे

आई-वडिलांना त्यांच्या मुलांना उत्तमातली उत्तम शिकवण द्यायची असते. आपलं मूल सगळ्यातच हुशार असावं असं पालकांना वाटतं. परंतु काही पालक प्रमाणाच्या बाहेर मुलांना कंट्रोल करू पाहतात. याचा वाईट परिणाम मुलांच्या मनावर होतो.

2. विचार क्षमता कमी होणे

पालक नेहमीच मुलांच्या कामामध्ये मदत करून त्यांचा आत्मविश्वास घालवतात आणि त्यामुळे मूल कोणतही काम एकट्याने करायला घाबरतात. पालकांनी नेहमीच मुलांची मदत करून त्यांची विचार क्षमता कमजोर नाही होणार याची काळजी घेतली पाहिजे.

3. मुल सतत आजारी पडण्याची शक्यता

मूलं बाहेर पार्क मध्ये किंवा इतर ठिकाणी खेळतात. मातीमध्ये, धुळीमध्ये खेळून मूल आजारी पडतील या भीतीने काही पालक आपल्या मुलांना कंट्रोल करू पाहतात. पण हीच गोष्ट टाळून मुलांना खेळून बागडून द्यायला हवं. तेव्हाच मुलाचं स्वास्थ चांगल राहील. मुलांना सतत कंट्रोल करायला गेले तर ते आजारी पडण्याची शक्यता अधिक असते.

4. पालकांशी भांडण होऊ शकते -

काही वेळा हायपर पॅरेंटिंगमुळे मुले पालकांना आपले शत्रू मानू लागतात. ते विचार करतात पालक सतत त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात, त्यांना काहीही करण्याचे स्वातंत्र्य नसते. त्यामुळे मुलं पालकांपासून दूर पळू लागतात आणि काही वेळा त्यांच्यापासून गोष्टी लपवतात.

5. स्वातंत्र्य न मिळाल्याने गुंडगिरीचे बळी-

प्रत्येक गोष्टीत पालकांचे नियंत्रण मुलांना लाजाळू बनवू शकते, जे इतरांच्या टिप्पण्यांनी सहजपणे दुखावले जातात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com