Hyundai i20 : फेसलिफ्ट हॅचबॅक मॉडेल लॉन्च ! दमदार फीचर्स व नव्या लूकसह सर्वसामान्यांना परवडणार, जाणून घ्या किंमत

Hyundai i20 Specification : Hyundai i20 ही प्रीमियम हॅचबॅक कार लवकरच ग्राहकांच्या भेटीला येणार आहे.
Hyundai i20
Hyundai i20 Saam Tv

Hyundai i20 Features : Hyundai i20 ही प्रीमियम हॅचबॅक कार म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. भारतीय बाजारपेठेतही ही कार तिच्या विभागात खूप लोकप्रिय आहे. आता दक्षिण कोरियाची कार निर्माता कंपनी Hyundai ने आपल्या i20 चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल सादर केले आहे.

नवीन लुक, वैशिष्ट्ये आणि नव्या तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही प्रीमियम हॅचबॅक कार लवकरच भारतीय (India) बाजारपेठेतही विक्रीसाठी दाखल होणार आहे. सध्या कंपनीने ते युरोपियन बाजारपेठेसाठी सादर केले आहे. कंपनीने (Company) या हॅचबॅकमध्ये काही नवीन अपडेट्स दिले आहेत ज्यामुळे ते सध्याच्या मॉडेलपेक्षा अधिक चांगले आहे.

Hyundai i20
Diesel Cars Banned : लवकरच बंद होणार डिझेल कार ! पेट्रोलियम मंत्रालयाचा Auto इंडस्ट्रीला मोठा झटका...

1. Hyundai i20 चे फीचर्स (Features)

 • या कारच्या लुक आणि डिझाईनबद्दल सांगताना कंपनीने नवीन ग्रिलसह सुधारित एलईडी डेटाइम रनिंग लाइट्सचा समावेश केला आहे.

 • याशिवाय फ्रंट बंपर आणि नवीन एअर व्हेंट्स कारचा फ्रंट लुक सुधारतात.

 • Hyundai लोगो देखील थोड्या प्रमाणात बदलण्यात आला आहे. याच्या प्रोफाईलमध्ये कोणताही मोठा बदल नसला तरी या कारमध्ये तुम्हाला नवीन डिझाईनचे अलॉय व्हील नक्कीच मिळतील. त्याची साइड कट आणि क्रीज लाईन्स पूर्वीप्रमाणेच आहेत.

2. कशी आहे Hyundai i20

 • Hyundai नेहमीच तिच्या केबिन डिझाइनसाठी प्रसिद्ध आहे.

 • Hyundai i20 च्या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये कंपनीने 10.25-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिला आहे. याशिवाय 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमही दिली जात आहे.

 • आत्तापर्यंत, त्याच्या केबिन वैशिष्ट्यांबद्दल बरीच माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Hyundai i20
Car Washing Tips : पैसे वाचवण्याच्या नादत घरीच कार धुताय ? या 6 चुका करु नका, पडेल महागात

3. स्पेस्फिकेशन

 • जागतिक बाजारपेठेत, i20 हे 1-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिनसह 6-स्पीड iMT किंवा 7-स्पीड DCT ऑटोमॅटिकशी जोडलेले आहे. जे दोन वेगवेगळ्या पॉवर आउटपुटसह येते. ज्यामध्ये 99 bhp आणि 118 bhp ची शक्ती समाविष्ट आहे.

 • प्रीमियम हॅचबॅक भारतात एकाच इंजिनसह उपलब्ध आहे, परंतु ते वेगळ्या पद्धतीने ट्यून केले गेले आहे, ज्यामुळे 120PS पॉवर आणि 172Nm टॉर्क निर्माण होतो.

 • ही कार 1.2 लीटर पेट्रोल इंजिनसह देखील येते जी 83PS पॉवर आणि 114Nm टॉर्क जनरेट करते.

 • हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. इंजिनच्या यंत्रणेत कोणताही बदल अपेक्षित नाही.

4. ADAS वैशिष्ट्ये

 • नवीन ट्रेंड म्हणून Hyundai i20 देखील आता Advanced Driving Assistance System (ADAS) वैशिष्ट्याने सुसज्ज असेल. ज्यामुळे या कारच्या सुरक्षिततेत आणखी सुधारणा होईल.

 • यामध्ये ब्लाइंड स्पॉट, रिअर क्रॉस ट्रॅफिक कोलिजन अव्हान्स, स्मार्ट क्रूझ कंट्रोल, फॉरवर्ड कोलिजन अव्हायडन्स वॉर्निंग सिस्टीम इत्यादी सुविधा मिळतील.

 • नवीन तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्यांमुळे ही कार सेगमेंटमध्ये वेगळी दिसेल.

 • या वर्षीच कंपनी ही कार भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी लॉन्च करेल अशी शक्यता आहे.

Hyundai i20
Numbers On Car Tyers : तुम्हाला माहीत आहे का ? कारच्या टायर्सवर नंबर का लिहिलेले असतात ?

5. किंमत

 • Hyundai i20 ची किंमत साधारणत: 8 लाखापर्यंत असू शकते

 • २०२० मध्ये लॉन्च झाली होती तेव्हा या कारची किमतही ७ लाखांपर्यंत होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com