Increased Risk of Heat Waves : वाढत्या उष्णतेच्या लाटांचा धोका अधिक ! तज्ज्ञांनी दिला इशारा, कशी घ्याल काळजी ?

Heat Waves : हवामान खात्याने पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
Increased Risk of Heat Waves
Increased Risk of Heat WavesSaam Tv

Increased Risk of Heat Waves : गेल्या काही दिवसांंपासून अवकाळी पावसामूळे आता पुन्हा वातावराणाची स्तिथी बिघडली आहे. हवामान खात्याने पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मे महिन्यात तापमानात वाढ होत असल्याने त्वचेसोबतच आरोग्याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. उष्णतेच्या लाटेमुळे आपल्या शरीराला अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानात स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.

येथे आम्ही तुम्हाला उष्णतेची लाट तुमचे आरोग्य (Health) कसे खराब करू शकते ते सांगणार आहोत. यासोबतच उष्णतेची लाट कशी टाळायची हे आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Increased Risk of Heat Waves
Heat Wave Mumbai News: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

निर्जलीकरण -

फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे संस्थापक सदस्य त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितले की, उष्णतेच्या लाटेचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे कोणतीही व्यक्ती डिहायड्रेशनची (Dehydration) शिकार होऊ शकते. उष्णतेच्या लाटेत, शरीरातून जास्त घाम येतो आणि शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे नुकसान होऊ शकते. यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे आणि थकवा येऊ शकतो. म्हणूनच साखरयुक्त पेयांपासून अंतर ठेवावे.

उष्माघात -

उष्माघातात शरीराचे तापमान झपाट्याने वाढते. हे गंभीर वैद्यकीय आणीबाणीमध्ये गणले जाते. यामध्ये हृदयाच्या वेगवान स्पंदनासोबतच त्वचा कोरडी पडू लागते. अशी कोणतीही लक्षणे जाणवल्यास ताबडतोब वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या. उष्माघात टाळण्यासाठी स्वत:ला जास्तीत जास्त हायड्रेटेड ठेवा.

Increased Risk of Heat Waves
Heat Wave: सावधान..आठवडाभर उष्णतेची लाट; नंदुरबारमध्‍ये पारा ४५ अंश सेल्सिअसवर जाण्याचा अंदाज

त्वचेचे नुकसान -

उष्णतेच्या लाटेचा शारीरिक आरोग्यावरच परिणाम होत नाही तर त्वचेवरही (Skin) परिणाम होतो, असे डॉ.मनीष सांगतात. उष्णतेच्या लाटेत सूर्याच्या अतिनील किरणांच्या संपर्कात आल्याने तुमच्या त्वचेचे लक्षणीय नुकसान होऊ शकते, ज्यामध्ये सनबर्न आणि त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी, दर दोन तासांनी 30 च्या SPF सह सनस्क्रीन लावा.

आपल्या डोळ्यांची काळजी घ्या -

सूर्याच्या अतिनील किरणांच्या प्रदीर्घ संपर्कात राहिल्याने मोतीबिंदू होण्याच्या जोखमीसह तुमच्या डोळ्यांनाही नुकसान होऊ शकते. डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी सनग्लासेस टोपी वापरा.

Increased Risk of Heat Waves
Heat Wave News: वाढती उष्णता बनली जीवघेणी, विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com