Corona Or Viral Fever : व्हायरल की, कोरोना... ताप आल्यावर कसे ओळखाल ? जाणून घ्या

Viral Infection : कोरोनामुळे पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. काही ठिकाणी पुन्हा मास्क सक्ती करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Corona Or Viral Fever
Corona Or Viral Fever Saam Tv

Corona Symptoms : बदलते हवामान व वाढत्या कोरोनामुळे अनेकजण आजारी पडत आहेत. यासोबतच कोरोनाचे रुग्णही झपट्याने वाढते आहे. कोरोनामुळे पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. काही ठिकाणी पुन्हा मास्क सक्ती करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

अशातच जर लोकांना आलेला ताप हे नेमके कोणत्या आजाराचे लक्षण आहे, अशी भीती निर्माण झाली आहे. कोविड-19 आणि विषाणूची लक्षणे खूप समान आहेत. अशा परिस्थितीत खरा आजार ओळखणे कठीण होऊन बसते. ताप आल्यावर तो व्हायरल की, कोरोना (Corona) हे ओळखणे कठीण होते. ते ओळखायचे कसे हे जाणून घ्या

Corona Or Viral Fever
Covid Symptoms : H3N2 सोबत पुन्हा वाढला कोविडचा उद्रेक ! कशी घ्याल आरोग्याची काळजी?

बदलते हवामान, कोरोना आणि H3N2 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्याची (Health) काळजी (Care) घेणे जास्त गरजेचे आहे. त्यासोबत रोगप्रतिकारशक्ती देखील अधिक बळकट असायला हवी. ज्यामुळे या आजारांपासून (Disease) आपले संरक्षण होईल.

व्हायरल ताप आला असेल तर तो अगदी 3-4 दिवसांत बरा होतो. यामध्ये स्नायू सतत दुखतात. डोकेदुखी, खोकला व रक्तसंचय व्यवस्थित होत नाही. तसेच जर कोरोना झाला असेल तर ताप आल्यास आपल्याला अस्वस्थ वाटू लागते. कुठल्याही पदार्थाची चव लागत नाही. पदार्थांचा वास कमी येतो. अचानक हृदयाचे ठोके वाढतात. यांसारखी लक्षणे दिसून येते.

Corona Or Viral Fever
Symptoms Of Cough-Fever : तुम्हालाही खोकला-ताप आहे, 'ही' लक्षणे नक्की कोणत्या विषाणूची; H3N2 की कोविड 19? जाणून घ्या

भारतात कोविडच्या नवीन XBB 1.16 सब-व्हेरियंटच्या प्रकरणांमध्ये तेजी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूच्या या प्रकारात शरीरात दुखणे, थकवा येणे, घसा खवखवणे आणि नाक वाहणे किंवा बंद होणे ही लक्षणे दिसतात.

आपल्याला ताप असल्यास स्वत: औषधोपचार करू नका. तुम्‍ही आजारी असल्‍यावर स्वत: औषधे घेणे टाळा. ताप कमी करणारे, प्रतिजैविक आणि वेदना निवारक यांचा परिणाम होऊ शकतो. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com