
Reliance Jio Plan : अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांना रिचार्जच्या बाबतीत हवी तशी सुविधा पुरवतात. जिओ ही कंपनी जगभरात पसरली आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन सुविधा पुरवत असते.
देशातील सगळ्यात मोठी कंपनी जिओने आपल्या ग्राहकांसाठी फ्री इंटरनेट सुविधा सुरु केली आहे. यामध्ये जिओच्या (Jio) प्रीपेड प्लान सोबत मिळणार आहे. हा प्लान ग्राहकांना अनलिमिडेट काँलिग्ससह 5G सोबतच 3 GB दिवसाला ऑफर करणार आहे. तसेच यात 40 GB पर्यंतचा फ्री डेटा देखील मिळणार आहे. कंपनी तसेच आपल्या जिओने यात IPL मॅच पाहण्याची संधी देखील लिमिटेड काळापर्यंत दिली आहे.
जिओच्या या प्लानमध्ये 40GB पर्यंत डेटा फ्री मिळेल, तसेच या प्रीपेड प्लानमध्ये 219 रुपये, 399 रुपये व 999 रुपयांचा प्लान मिळणार आहे. जाणून घेऊया या प्लानबद्दल सविस्तर
1. Jio ₹219 प्रीपेड प्लान
रिलायन्स जिओचा हा ₹ 219 प्रीपेड प्लान दिवसाला 3GB मोबाइल (Mobile) डेटा ऑफर करतो. या प्लानची वैधता 14 दिवसांपर्यंतची असेल यात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग डेटासह 100 एसएमएस फ्री मिळतात. यात ऑफर म्हणून Jio च्या या प्लानमध्ये 25 रुपये किमतीचे (Price) अॅड-ऑन व्हाउचर फ्रीमध्ये मिळत आहे तसेच यातही 2GB डेटा मिळतोय.
2. Jio ₹399 प्रीपेड प्लान
या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल्ससह दिवसाला 100 एसएमएस फ्रीमध्ये मिळणार आहे. हा प्लान 28 दिवसांच्या वैधतेपर्यंत मिळणार आहे. तसेच यात आपल्याला प्रतिदिन 3GB डेटा ऑफर करते. तसेच या ऑफरमध्ये यूजर्सला 61 रुपयांचे 6GB डेटा अॅड-ऑन व्हाउचर मोफत मिळणार आहे.
3. Jio ₹999 प्रीपेड प्लान
रिलायन्स जिओने ऑफर केलेल्या ₹ 999 प्रीपेड प्लानची वैधता 84 दिवस आहे. प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि दररोज 3GB डेटा मिळणार आहे. ऑफर अंतर्गत, खरेदीदार 241 रुपयांचे 40GB डेटा अॅड-ऑन मोफत घेऊ शकतात.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.