Kidney Stone Problem : मुतखड्याच्या दुखण्यावर जालीम उपाय ! फक्त 7 दिवसांत होईल त्रासातून सुटका

Kidney Stone Symptoms : अधिक प्रमाणात पाणी न पिणे व लघवी थांबवून ठेवल्यामुळे मुतखड्याचा आजार हा उद्भवला जातो.
Kidney Stone Problem
Kidney Stone ProblemSaam tv

How To Cure Kidney Stone : अधिक प्रमाणात पाणी न पिणे व लघवी थांबवून ठेवल्यामुळे मुतखड्याचा आजार हा उद्भवला जातो. तसे हा आजार होण्याची इतर अनेक कारणे देखील आहेत. मुतखड्याचा त्रास हा फार वेदनादायी असतो.

शरीरात लघवीचे खडे तयार झाल्यामुळे मुतखडा होतो. याचे प्रमाण पुरुषांमध्ये जास्त पाहायला मिळते. लघवीला (Urine) जाण्यास आळसपणा करणे, शरीरात पाण्याची कमतरता या काही कारणांमुळे मुतखडा होतो. मुतखड्याच्या समस्येवर डॉक्टरांच्या सल्ल्याने व मदतीने उपचार करणे शक्य आहे. यावर डॉक्टर विनोद शर्मा यांनी त्याच्या इन्स्ट्राग्राम अकाउंटवरुन काही घरगुती उपाय सांगितले आहे. जाणून घेऊया त्याबद्दल

Kidney Stone Problem
Symptoms Of Kidney Cancer : किडनी कॅन्सरच्या या लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

1. मुतखडा होण्याची कारणे (Reasons)

  • मुतखडा (Kidney Stone) होण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये अधिक असते. मुतखड्याचे सुमारे 80 टक्के पुरुष रुग्ण आहेत.

  • 20 ते 49 वर्षांच्या वयोगटातील व्यक्तींना हा त्रास होण्याची शक्यता असते.

  • सहसा कुटुंबातील व्यक्तीस हा आजार असल्यास याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो.

  • रक्तातील युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्याने मुतखडा तयार होतो.

  • अनेकदा गरोदरपणात स्त्रियांना मुतखड्याचा त्रास जाणवू शकतो.

Kidney Stone Problem
Kidney Health Care : लिंबूपासून बनवलेल्या 'या' ड्रिंक्स ठरतील किडनीसाठी अत्यंत फायदेशीर!
  • गरोदरपणात प्रोजेस्टेरॉनचा स्त्राव वाढल्याने लघवीचा वेग मंदावतो आणि खडे बनण्यास सुरूवात होतात.

  • तसेच गरोदरपणात कॅल्शियमचे मूत्रात उत्सर्जन झाल्यामुळे देखील मुतखड्याचा त्रास होऊ शकतो.

  • शरीराला गरज आहे तितके पाणी न मिळण्याबरोबरच काम, व्यायाम किंवा जुलाबामुळे शरीरातील पाणी कमी झाल्यास देखील मुतखड्याचा त्रास होऊ शकतो.

2. मुतखड्यावरील उपाय

मुतखड्यावर आपण डॉक्टरांचा सल्ला व मदतीने उपचार करू शकतो. पण तुम्हाला माहिती आहे का घरगुती उपाय करून नैसर्गिक पद्धतीने देखील मुतखड्यावर उपचार करणे शक्य आहे. आपल्या सर्वांच्या ओळखीचे असलेले जास्वंदाचे फुल मुतखड्यावर एखाद्या औषधाप्रमाणे काम करते. जास्वंदाच्या फुलाच्या पावडरचे सेवन केल्यास मुतखडा व लघवीचे बिघडलेले चक्र नियंत्रणात येऊ शकते. इजिप्तमध्ये लघवी साफ करण्यासाठी जास्वंदाचा औषधाप्रमाणे उपयोग केला जातो. जास्वंद फक्त मुतखडाच नाही तर कॉलेस्ट्रॉल व रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी, पोट साफ करण्यासाठी, एवढेच काय केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील हे गुणकारी ठरते.

Kidney Stone Problem
Lizards At Home : झोपतेतून उठल्यानंतर पाल दिसली तर, समजा...

3. जास्वंदाच्या काढ्याचे सेवन कसे कराल ?

  • जास्वंदाच्या फुलाची पावडर बनवून रात्री १ चमचा कोमट पाण्यात घ्यायला हवी. परंतु, जेवल्यानंतर १ ते १/२ तासानंतर घ्यावी.

  • हा काढा घेतल्यानंतर 3 ते 4 तास काहीही खाऊ नये ही गोष्ट लक्षात ठेवावी.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com