World Chocolate day : डॉर्क चॉकलेटचे आरोग्यास फायदे कसे होतील जाणून घ्या

लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना चॉकलेट खायला आवडते.
World Chocolate Day 2022, Benefits Of Chocolate, Health Benefits Of Dark Chocolate, Best Dark Chocolate, Dark Chocolate Nutritional Facts
World Chocolate Day 2022, Benefits Of Chocolate, Health Benefits Of Dark Chocolate, Best Dark Chocolate, Dark Chocolate Nutritional Factsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना चॉकलेट खायला आवडते. अनेकांना भेटवस्तू देताना पर्याय म्हणून चॉकलेटही दिले जाते. चॉकलेटचे सेवन केल्याने हृदयाला फायदा होतो.

हे देखील पहा -

चॉकलेटमुळे आपल्याला अनेक आजारांवर मात करता येते. आपल्याला अचानक चक्कर आल्यानंतर किंवा हायड्रेशनसाठी आपण चॉकलेट खातो. सध्या उच्च रक्तदाब ही सामान्य गोष्ट झाली आहे. आपले ब्लड प्रेशर वाढल्यास हृदयरोग, किडनीचे आजार, पक्षाघात आणि इतर अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात परंतु आपण डार्क चॉकलेटच्या मदतीने उच्च रक्तदाब नियंत्रित करू शकता. डार्क चॉकलेटमध्ये असे घटक असतात जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यात असणारे घटक हे चेहऱ्यासाठी उत्तम असतात. तसेच चॉकलेट (Chocolate) खाल्ल्याने उन्हापासून त्वचेचे संरक्षण होते. डार्क चॉकलेट खाल्ल्याने उच्च रक्तदाबाला फायदा कसा होतो हे जाणून घेऊया. (Health Benefits Of Dark Chocolate)

१. दिवसातून ३० ग्रॅम चॉकलेट खाल्ले तर आपला रक्तदाब नियंत्रणात राहू शकते. पांढऱ्या चॉकलेटपेक्षा डार्क चॉकलेटमध्ये दूध (Milk) आणि साखर कमी असते. त्यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते जे आपले शरीर सहज पचवू शकते. परंतु अधिक चॉकलेटचे सेवन केल्याने देखील आपले नुकसान होऊ शकते.

World Chocolate Day 2022, Benefits Of Chocolate, Health Benefits Of Dark Chocolate, Best Dark Chocolate, Dark Chocolate Nutritional Facts
पावसाळ्यात लोणच्याला बुरशी का लागते ?

२. डार्क चॉकलेटमध्ये फ्लॅव्हॅनॉल्स घटक आढळतात. शरीरात नायट्रिक ऑक्साईडचे उत्पादन वाढवण्यासाठी रक्तवाहिन्यांना उत्तेजित करते. त्यामुळे रक्त प्रवाहाचा प्रतिकार कमी करण्यास उपयुक्त आहे, ज्यामुळे रक्तदाबाचा धोका कमी होऊ शकतो.

३. डार्क चॉकलेटमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जे त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. याव्यतिरिक्त, ते वृद्धत्वाची चिन्हे, सुरकुत्या देखील कमी करते. डार्क चॉकलेटमध्ये थिओब्रोमाइन असते जे आपल्या दातांचे इनॅमल मजबूत करते. त्यामुळे पोकळीचा धोकाही कमी होतो. (Dark Chocolate Nutritional Facts)

४. डार्क चॉकलेट त्वचेतील रक्त प्रवाह सुधारण्यासाठी आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी देखील उपयुक्त मानले जाते. डार्क चॉकलेटमध्ये असलेले घटक तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करतात. आपल्या अधिक ताण किंवा थकवा आल्यास आपण चॉकलेटचे सेवन केल्यास फायदा होईल.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com