Hepatitis Day 2022: मुलांच्या यकृताचे आरोग्य निरोगी कसे ठेवाल ? या सुपरफूड्सचा आहारात समावेश करुन अनेक आजारांना दूर पळवा

यकृताच्या आरोग्यासाठी हे सूपरफूड्स खा.
how to make your liver healthy again, Hepatitis Day 2022, liver cleansing foods
how to make your liver healthy again, Hepatitis Day 2022, liver cleansing foods ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई :यकृत हा शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. यकृत निरोगी असेल तर आपण निरोगी राहू शकतो. यासंदर्भात अनेक आजार हे बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी व अनुवांशिक घटक यासारख्या कारणांमुळे आपण यकृताशी संबंधित अनेक आजारांना बळी पडू शकतो.

हे देखील पहा -

यकृत हा मानवी शरीराचा सर्वात मोठा व महत्त्वाचा अवयव आहे. यात पित्त बनण्यापासून ते आपण खाल्ले अन्नपगदार्थातील पोषक व जीवनसत्त्वाची साठवणूक करण्याचे कार्य यकृत करत असतो. तसेच शरीराला संसर्ग आणि रोगापासून वाचवण्यासाठी या सर्व गोष्टींचा समावेश होतो. आपल्या शरीरातील अल्कोहोल, ड्रग्ज आणि चयापचयांसारखे विषारी द्रव्ये देखील तोडते. अशा परिस्थितीत जर यकृत अस्वास्थ्यकर असेल तर त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसून येतो. आपण आहारात अशा काही सूपरफूडचा समावेश केल्यास आपल्याला पुरेसे जीवनसत्त्व, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मिळेल जाणून घेऊया त्याबद्दल

यकृत निकामी होण्याची लक्षणे काय आहेत?

उलट्या होणे, भूक न लागणे, थकवा येणे, जुलाब, कावीळ, सतत वजन कमी होणे, शरीरात खाज सुटणे, सूज येणे, ओटीपोटात द्रव साचणे यांसारखी लक्षणे यकृत खराब झाल्यास किंवा कमकुवत झाल्यास दिसतात.

how to make your liver healthy again, Hepatitis Day 2022, liver cleansing foods
Child care : या आजारामुळे बिघडू शकते मुलांचे आरोग्य, हा आजार होतो कसा ? जाणून घ्या त्याविषयी

जाणून घ्या यकृत खराब होण्याचे कारण काय?

आहारामुळे यकृतावर परिणाम होतो, तसेच अल्कोहोलचे अतिसेवन, अतिरिक्त चरबी, संसर्ग, जास्त प्रमाणात लोह आणि तांबे साचणे, कर्करोग यामुळे यकृतावर परिणाम होतो. अशा स्थितीत तुम्ही यकृताशी संबंधित अनेक आजारांच्या विळख्यात पडतात.

हे पदार्थ यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील.

१. ब्रोकोली, फुलकोबी, ब्रुसेल्स स्प्राउट्स, यांसारख्या भाज्यांमध्ये ग्लूटाथिओन असते, जे यकृतातील विष-शुद्धीकरण करते. हे खाल्ल्याने आपल्या शरीरातील ग्लुकोसिनोलेटचे उत्पादन वाढते ज्यामुळे कार्सिनोजेन्स आणि इतर विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.

२. ऑलिव्ह ऑइलमध्ये चरबी असते, परंतु ते सामान्यतः निरोगी मानले जाते. ऑलिव्ह ऑइलचे सेवन यकृतातील चरबीची पातळी कमी करण्यास व रक्त प्रवाह वाढविण्यास आणि यकृतातील एन्झाईम्सची पातळी सुधारण्यास मदत करते.

how to make your liver healthy again, Hepatitis Day 2022, liver cleansing foods
World hepatitis day : हिपॅटायटीसच्या आजारावर काही घरगुती टिप्स

३. ग्रीन टी यकृतासाठी फायदेशीर ठरू शकते. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाने ओळखले जाणारे अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. कॅटेचिन यकृत डिटॉक्सिफाई करण्यात आणि यकृताची जळजळ कमी करण्यास मदत करतात.

४. लिंबूवर्गीय फळे (Fruit) यकृताला उत्तेजित करतात आणि विषारी पदार्थांचे पाण्यात रूपांतर करण्यास मदत करतात जे पाण्याद्वारे (Water) शोषले जाऊ शकतात. द्राक्षे विशेषतः चांगली असतात कारण त्यात नारिंगिन असतात, जे अँटिऑक्सिडेंट असतात. हे यकृताला दुखापतीपासून वाचवते आणि जळजळ कमी करते.

५. लसणात सल्फर कंपाऊंड असते जे यकृत एंजाइम सक्रिय करते. हे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ आणि टाकाऊ पदार्थ बाहेर काढून टाकण्यास कार्य करते. त्यात सेलेनियम देखील असते जे यकृताला नुकसान होण्यापासून वाचवते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com