Maharashtra Budget 2023- 24 : राज्यातील महिला, मुलींसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद; 'लेक लाडकी' योजनेची घोषणा

Maharashtra Budget Session : विधीमंडळात महिलांसाठी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे.
Maharashtra Budget Session
Maharashtra Budget SessionSaam Tv

Maharashtra Budget Session 2023 : शिंदे-फडवणीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर झाला. राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा 2023-24 या अर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर केला.

अर्थसंकल्पात (Budget) माहिला, मुलांसाठी भरीव तरतूद करण्यात आलीआहे. महिलांना (Women) एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सुट मिळणार आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनातही मोठी वाढ करण्यात आली आहे.

Maharashtra Budget Session
Maharashtra Budget 2023-24: राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, नमो शेतकरी योजनेद्वारे वार्षिक 12000 रुपये मिळणार

1. महिलांना कोणत्या विशेष सुविधा मिळणार हे जाणून घेऊया

राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत

- चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार

- महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर

- कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर

- मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना

- महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण

- माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य (Health) तपासणी, औषधोपचार

Maharashtra Budget Session
BMC Budget 2023-24: मुंबई महानगरपालिकेचा 50 हजार कोटींचा अर्थसंकल्प आज होणार सादर ;मुंबईकरांच्या अपेक्षा होणार का पूर्ण?

1. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ

- आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये

- गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये

- अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये

- मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये

- अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये

- अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार

- अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com