Ginger Benefits : चवीपासून ते आरोग्यापर्यंत आल्याचे बहुगुणी फायदे !

Ginger Benefits For Health : आले पावडरचा वापर करून अनेक आरोग्यासंबंधित समस्या दूर करू शकता.
Ginger Benefits
Ginger Benefits Saam Tv

Ginger Benefits : स्वयंपाकघरात आल्याचा वापर चहापासून ते भाज्यांपर्यंत सर्व गोष्टीत केला जातो. आले हा स्वयंपाकघरातील आढळणारा महत्त्वाचा घटक आहे. त्यासोबतच आपल्या आरोग्यासाठी आले खूप फायदेशीर आहे.

तसेच सुक्या आल्याला पोषकतत्वांचा खजिना समजला जातो. त्यामुळे तुम्ही आले पावडरचा वापर करून अनेक आरोग्यासंबंधित समस्या दूर करू शकता.

Ginger Benefits
Garlic And Ginger Paste : आलं-लसूण पेस्ट साठवायची आहे ? तर 'या' टिप्स फॉलो करा

न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी इंस्टाग्राम अकाउंटवरून आलं पावडरचे आरोग्यला (Health) होणारे फायदे सांगितले आहे. त्यासोबत रुजुता यांनी आले पावडर सेवन करण्याच्या विविध पद्धती देखील सांगितले आहेत. याबद्दल तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. रुजुता सांगतात की, आले पावडर शारीरिक वेदना आणि समस्या दूर करण्यासाठी फार उपयुक्त आहे.

1. आले पावडर फायदेशीर का आहे ?

  • आल्याचा पावडरमध्ये बायोएक्टिव्ह रेणू असतात जे शरीरात औषधासारखे काम करते.

  • तसेच आले पाडवडर अँटीऑक्सडंट्सने समृध्द आहे

  • आले पावडर ट्रीप्सिन आणि लिपेस ( प्रथिने आणि एनझाएम्स चरबी तोडणायाठी आवश्यक) च्या क्रियेत मदत करते.

  • आले पावडर वेदना कमी करण्यासाठी कार्य करते.

Ginger Benefits
Health Tips : खरंच की, काय ? उन्हाळ्यात 'हा' लाडू खाल्ल्यास हृदयविकाराचा धोका होईल कमी, तर डोळ्यांचे आरोग्यही सुधारेल !

2. आले पावडर वापरण्याची पद्धत

1.आले पावडर निस्तेज त्वचा आणि कोंडा यासारख्या समस्या दूर करण्यासाठी वापरता येते. जर तुम्हाला गुडघे दुखीचा त्रास होत असेल तर तुमच्यासाठी आले पावडर खूप उपयुक्त आहे. पोटाच्या समस्यांपासून आराम मिळण्यसाठीही आले पावडर कार्य करते.

2. तुझी रात्री झोपन्यापूर्वी एक ग्लास दुधात (Milk) थोडेसे आले पावडर घालून पिऊ शकता. यामुळे तुम्हाला चांगली झोप लागते.

Ginger Benefits
Kidney Health Care : लिंबूपासून बनवलेल्या 'या' ड्रिंक्स ठरतील किडनीसाठी अत्यंत फायदेशीर!

3. आल्याची पूड, गूळ आणि तुपासोबतही खाता येते. यामुळे तुमचा दिवसभर उत्साह राहील.

4. आले पावडर गूळ, तूप आणि हळद (Turmeric) सम प्रमाणात मिसळून लहान मुलांना गोळ्याच्या स्वरूपात देऊ शकता. यामुळे सर्दी, खोकला किंवा फ्लू इत्यादी आजार (Disease) टाळण्यास मदत होते.

5. जर तुम्हाला चहा प्यायला आवडत असेल तर त्यात आले पावडर घाला त्यामुळे चहाला चव येते आणि यातून तुम्हाला अनेक फायदेही मिळू शकतात.

6. आले पावडरचा आहारात समावेश करून तुमच्या केस आणि त्वचेच्या समस्या दूर ठेवू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com