NABARD Recruitment 2023 : तरुणांसाठी आनंदाची बातमी! नाबार्डमध्ये 150 पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

NABARD Recruitment 2023 Apply Online : जर तुम्हाला सरकारी खात्यात किंवा बँकेत नोकरी करायची असेल तर तुम्ही आजच अर्ज करायला हवा.
NABARD Recruitment 2023
NABARD Recruitment 2023 Saam tv

NABARD Recruitment 2023 Online Application Process:

सरकारी खात्यात काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. जर तुम्हाला सरकारी खात्यात किंवा बँकेत नोकरी करायची असेल तर तुम्ही आजच अर्ज करायला हवा.

बँकिंग परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी नॅशनल नॅशनल बँक ऑफ अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड)मध्ये सरकारी पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लगेच अर्ज करु शकता.

NABARD Recruitment 2023
SBI PO Recruitment 2023 : ड्रीम जॉबचं स्वप्न लवकरच होणार पूर्ण! SBI मध्ये 2000 जागांसाठी भरती, आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु

1. किती जागा रिक्त

नाबार्डमध्ये ११ पदांसाठी १५० जागांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये जनरल , आयटी, फायनान्स, कंपनी (Company) सेक्रेटरी, सिव्हिल इंजिनीअर, इलेक्ट्रिकल इंजिनीअर, जियो इन्फोर्मेशन, फोरेस्टरी , फूड प्रॉसेसिंग, स्टॅटेस्टिक, मास कम्युनिकेशन/ मीडिया स्पेशलिस्ट या जागांचा समावेश आहे.

NABARD Recruitment 2023
Most Famous Tourist Place In Nashik : नाशिकमधली ही जागा आहे निसर्गसंपन्न, पावसाळयात हिरव्यागार शालुने बहरतो आसंमत

2. अर्ज करण्याची शेवटची तारीख

या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २३ सप्टेंबर आहे. नाबार्डच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही अर्ज करू शकता.

3. वयोमर्यादा आणि पात्रता

या पदांसाठी अर्ज (Apply) करणाऱ्या उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्षे असणे आवश्यक आहे. उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवी अभ्यासक्रमात उत्तीर्ण असायला हवे.

NABARD Recruitment 2023
South Bombay Famous Place : दक्षिण मुंबईतील झक्कास ठिकाणं...,खाणं-फिरणं सगळं एकाच दिवसात होईल!

4. निवड प्रक्रिया

निवड करताना उमेदवाराला प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि नंतर मुलाखत घेतली जाईल. तसेच सामान्य आणि ओबीसी वर्गासाठी ८०० रुपये अर्ज शुल्क तर SC/ST/PWD असणाऱ्या उमेदवारांसाठी १५० रुपये शुल्क (Fees) भरावे लागणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com