Watermelon Seeds Benefits : फक्त कलिंगडच नाही तर बिया देखील आहेत फायदेशीर, वाचाल तर थक्क व्हाल !

Watermelon Benefits : कलिंगड शारीरिक फायदे देण्यासोबतच मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.
Watermelon Seeds Benefits
Watermelon Seeds BenefitsSaam Tv

Summer Season : उन्हाळ्यात आपल्या सर्वत्र पाहायला मिळते ते कलिंगड. या मोसमात अशी अनेक फळे आहेत ज्याचा आपण आहारात समावेश करु शकतो. उन्हाळ्यात मिळणाऱ्या या फळांच्या यादीत कलिंगडाचे नाव आधी येते.

अनेक गुणांनी परिपूर्ण असलेले कलिंगड (Watermelon) या ऋतूत शरीराला पाण्याचा पुरवठा तर करतेच शिवाय आपल्याला अनेक समस्यांपासून दूर ठेवते. कलिंगड शारीरिक फायदे देण्यासोबतच मानसिक आरोग्यासाठीही (Mental Health) खूप फायदेशीर आहे.

Watermelon Seeds Benefits
Bad Habits For Mental Health : 'या' 6 सवयी ठरु शकतात मानसिक आरोग्यासाठी घातक !

पण तुम्हाला माहित आहे का की कलिंगड सोबतच त्याच्या बिया देखील अनेक प्रकारे आपल्यासाठी फायदेशीर आहेत. अनेकदा लोक कलिंगड खात असताना ते निरुपयोगी समजून त्याचे बिया फेकून देतात. मात्र, पाहायला गेल तर कलिंगडाप्रमाणेच त्याच्या बियांचेही अनेक फायदे आहेत. जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल जे कलिंगडच्या बिया निरुपयोगी समजून फेकून देतात, तर एकदा तुम्हाला त्याचे फायदे (Benefits) जाणून घ्या.

1. प्रजनन क्षमता संबंधित समस्यांवर प्रभावी

कलिंगडाच्या बिया पुरुषांसाठी वरदानापेक्षा कमी नाहीत. याच्या वापराने प्रजनन क्षमता संबंधित समस्यांमध्ये खूप आराम मिळतो. या बिया खाल्ल्याने शुक्राणूंची संख्या तर वाढतेच पण प्रजनन क्षमताही सुधारते. याशिवाय यामध्ये असलेले झिंक शुक्राणूंची गुणवत्ता वाढवण्यास मदत करते.

Watermelon Seeds Benefits
Women Health Tips : महिला चयापचयाच्या विकाराने त्रस्त! काय करावे उपाय? कशी घ्यावी काळजी?

2. हृदय निरोगी

कलिंगडाच्या बिया हृदयासाठीही खूप फायदेशीर असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात असलेले मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात.

3. पाचक प्रणाली

जर तुम्ही कलिंगडाच्या बियांचे सेवन केले तर तुमच्या पचनसंस्थेलाही त्याचा खूप फायदा होतो. जर तुम्ही पचनाच्या समस्येने त्रस्त असाल तर कलिंगडाच्या बियांचे सेवन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

4. वजन कमी करण्यात प्रभावी

जर तुम्हाला तुमचे वजन कमी वेळात सहज कमी करायचे असेल तर यासाठी कलिंगडाच्या बिया देखील उपयोगी पडू शकतात. वास्तविक, त्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते, जे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

Watermelon Seeds Benefits
Benefits Of Coconut Malai: रक्तातील साखरेच्या पातळीपासून ते वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल शहाळ्याची मलई !

5. हाडे मजबूत

जर तुम्हाला तुमची हाडे मजबूत बनवायची असतील तर यासाठी कलिंगडाच्या बिया खूप फायदेशीर ठरतील. यामध्ये असलेले ओमेगा ३ फॅटी अॅसिड, प्रथिने, झिंक, फोलेट, पोटॅशियम, कॉपर हे नैसर्गिक मल्टीविटामिनसारखे काम करतात आणि हाडे मजबूत करतात.

6. त्वचेसाठी चांगले

कलिंगडाच्या बिया केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही फायदेशीर असतात. या बिया बारीक करून चेहऱ्यावर लावल्याने तुमची त्वचा चमकदार तर होतेच पण ब्लॅकहेड्सही दूर होतात. तसेच चेहऱ्यावर ग्लो येतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com