Parenting Tips : तुमचे मुल देखील शाळेत जाताना रडते ? असू शकते 'हे' कारण

जर तुमचे मूल दररोज शाळेत जाण्यासाठी खूप जास्त किंवा वारंवार रडत असेल तर...
Parenting Tips
Parenting Tips Saam Tv

Parenting Tips : मुलांना शाळेत जायला आवडते पण रोज रोज शाळेत जायच म्हटलं की, त्यांना रडू येतं. हसत खेळणारी लहान मुलं शाळेत जाताना कधी कधी रडायला लागतात. अशा परिस्थितीत कधीकधी पालकांना मुलाला आणि स्वतःला हाताळणे खूप कठीण होते.

शाळेत जाणारे मूल एकतर रडते किंवा त्याला काही तरी हवे असल्यास ते हट्ट करु लागते. परंतु जर तुमचे मूल दररोज शाळेत जाण्यासाठी खूप जास्त किंवा वारंवार रडत असेल तर याचा अर्थ असा होतो की मुलाला तुमच्यासोबत काहीतरी शेअर करायचे आहे.

शेवटी, मुले (Child) शाळेत का रडतात, मुले शाळेत जाण्यास कचरतात आणि मोठ्याने रडू लागतात तेव्हा कोणती कारणे आहेत. चला जाणून घेऊया अशाच काही खास कारणांबद्दल-

Parenting Tips
Parenting Tips : किशोरवयीन अवस्थेत मुलांना जास्त ताण येतोय? पालकांनी अशाप्रकारे घ्यावी काळजी
  • शाळेत मुले रडण्याची अनेक कारणे असू शकतात. अनेकवेळा मुलांना शाळेतील वातावरण आवडत नाही म्हणून ते शाळेत गेल्यावर रडायला लागतात. अशा परिस्थितीत पालकांनी आपल्या पाल्याला शाळेचे महत्त्व सांगून त्यांचा दृष्टिकोन समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून ते तुमचे ऐकतील.

  • बहुतेक लहान मुले शाळेत रडतात, याचे कारण म्हणजे, त्यांना त्यांचे कुटुंब आणि त्यांच्या घराच्या आजूबाजूचे वातावरणाची त्यांना सतत आठवण येते, त्यामुळे मूल थोडे अस्वस्थ होऊन रडू लागते.

  • सगळ्यात महत्त्वाचे व मुख्य कारण मुलं दिवसभर आपल्या आईसोबत असते अचानक शाळेत गेल्यानंतर त्याला असे वाटू लागते की, आपली आई आपल्यापासून दूरावली गेली आहे.

Parenting Tips
Parenting Tips : मुलांमधील आत्मविश्वास वाढवायचा आहे ? पालकांनी 'या' 3 गोष्टींकडे लक्ष द्या
  • शिक्षिका पसंत नसतानाही मूल शाळेत जाण्यास टाळाटाळ करू लागते. खरं तर, मुलाला शाळेत जाण्याची भीती वाटते, तेव्हाच तो शाळेत (School) जाताच रडायला लागतो.

  • काही मुले दुसर्‍या मुलामुळे शाळेत जाण्यास कचरतात. शाळेत काही मुलांकडून धमकावले जाते किंवा समोरच्या मुलांसोबत त्याला तो प्रसंग नीट हाताळता येत नाही.

  • काही मुलं अशी असतात जी खूप हट्टी असतात. अशा परिस्थितीत जेव्हा मुलांना ते काम करायला लावले जाते जे त्यांना करायला आवडत नाही, तेव्हा ते वेळोवेळी रडायला लागतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com