Parenting Tips: वाढत्या इंटरनेट आणि ऑनलाइन गेमिंगचा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम; पालकांनी अशी घ्यावी काळजी

किशोरवयीन मुलांना इतके व्यसन लागले आहे की ते सतत ६ ते १० तास स्मार्टफोनवर गेम खेळत आहेत.
Parenting Tips
Parenting TipsSaam Tv

Parenting Tips : स्मार्टफोनमध्ये व्हिडीओ गेम्सची सर्व सुविधा असल्यामुळे लहान मुले आणि किशोरवयीन मुलांना इतके व्यसन लागले आहे की ते सतत ६ ते १० तास स्मार्टफोनवर गेम खेळत आहेत.

ही समस्या काय आहे, त्याची लक्षणे काय आहेत आणि त्यावर उपाय काय असू शकतात. असे प्रश्न तुमच्याही मनात निर्माण होत असतील तर असे समजून घ्या

Parenting Tips
Parenting Tips : पहिल्यांदाच आई बनलेल्यांनी 'या' चुका करु नका, बाळावर होईल विपरीत परिणाम !

1. ही समस्या काय आहे?

आजकाल इंटरनेटचे व्यसन ही मुले (Child) आणि तरुणांमध्ये एक समस्या बनली आहे, ज्याचा परिणाम मुलांमध्ये ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाच्या रूपात दिसून येत आहे. स्मार्टफोनमध्ये व्हिडीओ गेम्सची सर्व सुविधा असल्यामुळे लहान मुले आणि किशोरवयीन मुलांना इतके व्यसन लागले आहे की ते सतत ६ ते १० तास स्मार्टफोनवर गेम खेळत आहेत. याचा परिणाम अभ्यासावर तर होतोच, पण सामाजिक वर्तुळही आकुंचित होत आहे.

online game
online game Canva

2. या समस्येची मुख्य लक्षणे

  • ऑनलाइन गेममध्ये (Game) अधिकाधिक वेळ घालवणे.

  • खेळ खेळता येत नसताना एक प्रकारची अस्वस्थता दाखवणे.

  • गेमिंगला इतके प्राधान्य देणे की इतर सर्व क्रियाकलाप आणि महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष करणे.

  • वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यावर परिणाम करणारे गेमिंग.

  • तुमच्या इंटरनेट गेमच्या वापराबद्दल इतरांना खोटे बोलणे.

  • या व्यसनामुळे झोप, खाणे आणि शारीरिक हालचालींवर परिणाम होतो.

3. जाणून घ्या उपाय काय

  • या समस्येमुळे मुलांना त्यांची वैयक्तिक आणि सामाजिक कामे करणे कठीण जाते.

  • यामध्ये प्रामुख्याने मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञांची मदत उपचारासाठी घेता येते.

  • पालकांनी मुलांना जास्तीत जास्त वेळ द्यावा.

  • पौगंडावस्थेत येणाऱ्या समस्यांबद्दल मुलाशी मोकळेपणाने बोला.

  • मुलांच्या इंटरनेट वापरासाठी एक निश्चित वेळ सेट करा.

  • मुलांमधील ती कामे ओळखा, ज्यामध्ये त्यांना शांती आणि आनंद मिळतो.

  • तुमचा छंद असेल तर तो विकसित करण्याचा प्रयत्न करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com