Unique Ways To Praise Your Child : पालकांनो, मुलांचे असे करा कौतुक, चेहरा खुलेल फुलासारखा!

Child Care Tips : लहान मुलं हे मोठ्या माणसांकडून खूप काही शिकत असते आणि ते आपल्या पालकांचा आदर्श स्वतः समोर ठेवतात.
Unique Ways To Praise Your Child
Unique Ways To Praise Your ChildSaam Tv

Parenting Tips : लहान मुलांचे मन खूप निर्मळ असते. लहान मुलं हे मोठ्या माणसांकडून खूप काही शिकत असते आणि ते आपल्या पालकांचा आदर्श स्वतः समोर ठेवतात. त्यामुळे पालकांनी केलेली स्तुती मुलांना आनंदी ठेवते.

तुमचे तुमच्या मुलांवर किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी त्यांचे कौतुक करणे हा एक मार्ग आहे. मुलांनी केलेल्या कामाची स्तुती करून त्यांना प्रोत्साहन देता येते त्यामुळे त्यांचा आत्मसन्मान वाढतो.

Unique Ways To Praise Your Child
Parenting Tips : मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

जरा वेगळ्या पद्धतीने मुलांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो त्यामुळे या काही सांगलेल्या पद्धतीने तुम्ही त्यांचे कौतुक करून त्यांचा निरागस चेहऱ्यावर हसू आणू शकता.

1. अभ्यासातील यशाबद्दल

तुमच्या मुलांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक (Education) क्षेत्रात मिळालेले यश किंवा स्पोर्ट्स मध्ये मिळालेल्या यशाचे तुम्ही भरभरून कौतुक केले पाहिजे.त्यांना सांगितले पाहिजे तुम्ही किती हुशार आहात तुम्ही आयुष्यात खूप काही करू शकता.असे बोलून मुलांना त्यांच्या भविष्याबद्दल मोटिवेट करू शकता.असे सकारात्मक (Positive) शब्द ऐकल्याने मुलांना पुढे जाण्यास प्रोत्साहन मिळते.

2. प्रॉब्लेम सॉल्व्हर बनवा

तुमच्या मुलाने एखादी समस्या सोडवण्यास मदत केली तर त्याला प्रतिभावना म्हण्याऐवजी त्याला सांगा की तुम्ही खूप उत्कृष्ट उत्तर दिले आहे. त्यामुळे मुलांमध्ये समस्या सोडवण्याचे कौशल्य वाढण्यास मदत होते आणि मुले aस्वतःहून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात.

Unique Ways To Praise Your Child
Parenting Tips : परीक्षेच्या काळात पालकांनी मुलांच्या आहारात 'या' पदार्थांचा समावेश करावा, बुद्धी होईल अधिक तल्लख !
Parenting Tips
Parenting Tips canva

3. मुलांचा आत्मविश्वास वाढवा

मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याने फार आवश्यक असते. म्हणून त्यांना नेहमी सुपर असल्याचा दर्जा देऊ नका त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. मुलाने एखादे कोडे सोडवले तर तो कोडे सोडवण्यात किती चांगला आहे असे म्हणण्याऐवजी त्याने अवघड कोडे सोडवण्याचा खूप चांगला प्रयत्न केला आहे असे बोलून लहान मुलांचा (Kids) आत्मविश्वास वाढवू शकता.

4. वर्णन करा

जेव्हा लहान मूल चित्र काढते तेव्हा सामान्यपणे आपण तू किती छान चित्र काढले असे म्हणून त्याचे कौतुक करतो.पण कौतुक करण्यासाठी असे शब्द न वापरता त्या ऐवजी त्याला सांगा की तुझी चित्रांमध्ये वेगवेगळे रंग वापरण्याची पद्धत मला खूप आवडली त्यामुळे मुलांना वाटेल की आपण त्याच्या चित्रात खरोखर आवड दाखवले आहे.

5. दयाळू असण्याबद्दल त्यांची प्रशंसा

तुमच्या मुलांनी केलेल्या चांगल्या कामाचे तुम्ही कौतुक केलेच पाहिजे. त्यांनी जर त्यांच्या आवडीची गोष्ट एखाद्या सोबत शेअर केले तर त्यांना देवदूत म्हणण्याऐवजी तुम्ही किती दयाळू आहात असे म्हणून त्यांची स्तुती केल्यास त्यांना इतरांना मदत करण्यात प्रोत्साहन मिळते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com