Study Time Table : पालकांनो, परीक्षेच्या काळात असं ठेवा मुलांचं वेळापत्रक

Child Study Time : पालक मुलांना दिवसरात्र फक्त अभ्यास करायला लावतात. त्याच्या मते यामुळे परीक्षेत मुलांना यश प्राप्त होते.
Study Time Table
Study Time TableSaam Tv

Study Time Table : महाराष्ट्रमध्ये १० वीचे पेपर सुरू होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांसोबत पालकही चिंतेत आहेत. पालक मुलांना दिवसरात्र फक्त अभ्यास करायला लावतात. त्याच्या मते यामुळे परीक्षेत मुलांना यश प्राप्त होते. पण याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.

दिवसरात्र केवळ अभ्यासच केल्याने मुलांवर तणाव निर्माण होतो. त्यामुळे मुलांना अभ्यासासोबतच माईंड फ्रेश होण्यासाठी आणि आराम मिळवण्यासाठी योग्य वेळापत्रक बनवणे गरजेचे असते.

Study Time Table
Exam Stress Control : पालकांनो, परीक्षेच्या काळात मुलांना ताण येतोय? अशी घ्याल काळजी

म्हणून तुम्ही जर परीक्षेचे (Exam) वेळापत्रक तयार करत असला तर नक्कीच त्यात मुलांसाठी नक्कीच आराम करण्यासाठी आणि खेळण्यासाठी वेळ काढा. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच वेळापत्रक तयार करण्याबद्दल सांगणार आहोत.

प्रत्येकाची मानसिक श्रमता वेगळी असते.पण प्रत्येकाने योग्य टाईम टेबलचा वापर केला तर कोणताही परीक्षेत चांगले गुण मिळविणे काही अवघड नाही. म्हणून टाईम टेबल आखताना अभ्यास सोबत आराम (विश्रांती)करणे ही महत्वाचे आहे.

हे विसरता कामा नये. कारण पुरेशी विश्रांती घेतल्याने मानसिक ताण (Stress) कमी होतोच त्याच बरोबर कार्य श्रमता वाढते.त्यामुळे टाईम टेबल बनवताना आरामाची वेळ (Time) निश्चित करा. प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. काही रात्री अभ्यास करतात त्यांनी दिवसा विश्रांती केली पाहिजे. तर काही दिवसा अभ्यास करतात त्यांनी रात्री विश्रांती करावी.

Study Time Table
Child Care Tips : मुलांच्या हेल्दी स्लीपिंग पॅटर्नसाठी वापरा 'या' टिप्स !

परीक्षेचा वेळापत्रकानुसार अभ्याचे वेळापत्रकानुसार तयार करावे. पहिला पेपरला जास्त वेळ दिला पाहिजे कारण त्या पेपरसाठी वेळ कमी असतो. विद्यार्थ्यांना अवघड जाणारी विषय म्हणजे विज्ञान आणि गणित. त्यामुळे या दोन विषयासाठी जास्त वेळ देणे महत्वाचे आहे. म्हणून या दोन्ही विषयांचा दररोज सराव करावा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com