Piles Symptoms : अवघड जागेचं दुखणं मूळव्याध, तो कसा होतो ? त्याची कारणे व लक्षणे जाणून घ्या

आपण सतत बाहेरचे पदार्थ, अधिक मसालेदार, तेलकट व मैद्याचे पदार्थ खाल्ल्यास मूळव्याधाची समस्या उद्भवू लागते.
what is piles, Mulvyadh symptoms in Marathi
what is piles, Mulvyadh symptoms in MarathiSaam tv

Piles Symptoms : पाण्याची शरीरात निर्माण झालेली कमतरता व बध्दकोष्ठतेमुळे आपल्याला मूळव्याध होऊ शकतो. आपली पचनक्रिया सुरळीत न झाल्यास आपल्याला ही समस्या भेडसावत राहाते.

हे देखील पहा -

मुळव्याध किंवा पाईल्स ही गंभीर समस्या आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे व बदलेल्या जीवनशैलीमुळे हा आजार होऊ शकतो. आपण सतत बाहेरचे पदार्थ (Food), अधिक मसालेदार, तेलकट व मैद्याचे पदार्थ खाल्ल्यास ही समस्या उद्भवू लागते. काहीवेळेस एकाच ठिकाणी बसून राहिल्यास व शरीराची हालचाल न झाल्यासही हा त्रास जाणवू लागतो. मूळव्याध म्हणजे गुदाशय आणि गुदद्वाराजवळ असलेला कोंब. हे कोंब गुदद्वाराच्या आत किंवा त्याच्या बाजूनेही असू शकतात. हे कोंब म्हणजे मोठ्या झालेल्या रक्तवाहिन्या असतात. काहीवेळेस याचा त्रास हा सौम्य स्वरुपाचा असल्यामुळे याची लक्षणे आपल्याला जाणवत नाही. यामुळे आपल्याला शौचानंतर रक्तस्त्राव होणे, त्या ठिकाणी खाज लागणे यांसारख्या समस्या जाणवू लागतात.

कारणे -

तज्ज्ञांच्या मते गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांमधील दाब वाढला की हा त्रास होतो. बहुतेक वेळा मूळव्याधीचा त्रास शौचाला कायम जोर करण्यामुळे आणि कुंथण्यामुळे होतो. आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता असल्यामुळे बद्धकोष्ठ होते आणि त्यामुळे शौचाच्या वेळी जोर द्यावा लागतो. याचे कारण वाढलेले वजन, वयोमानानुसार, गर्भावस्था किंवा अनुवांशिकता यामुळे होतो.

what is piles, Mulvyadh symptoms in Marathi
Foods For Healthy Pancreas : हा आजार असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घ्या, स्वादुपिंड मजबूत करण्यासाठी हे पदार्थ खा

लक्षणे-

बहुतेक वेळा या समस्येची (Problems) लक्षणे ही सामान्य असतात तर काही वेळा उपचार न करता देखील हे बरे होते. परंतु हा त्रास झाल्यानंतर आपल्याला शौचानंतर रक्तस्त्राव होणे, त्या ठिकाणी खाज लागणे, दुखणे किंवा सूज येते. चालताना किंवा बसताना अधिक त्रास जाणवू लागतो. हा त्रास काही आयुर्वेदिक किंवा घरगुती उपचारांनी देखील बरा होतो.

मूळव्याधीची लक्षणे बरेचदा उपचाराशिवायही काही दिवसात बरी होतात . गर्भावस्थेदरम्यान झालेला मूळव्याध बाळाच्या जन्मानंतर बरा होतो. परंतु, गुदद्वाराच्या जवळ आणि आत असण्याऱ्या रक्तवाहिन्यांवरील ताण कमी करण्यासाठी जीवनशैलीत खालील बदल करणे आवश्यक आहे –

• आहारातील तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढवणे. आहारात फळे, पालेभाज्या, कोशिंबिरी, सुकामेवा, कडधान्ये आदी पदार्थांचे सेवन करणे. भरपूर प्रमाणात द्रवपदार्थ, विशेषत: पाणी प्यावे. अतिरिक्त प्रमाणात चहा व कॉफी आणि मद्यपानाचे सेवन टाळावे.

• शौचाची भावना झाल्यानंतर शौचास जाण्यास उशीर करू नये. असे केल्यामुळे शौच अधिक कठीण आणि कोरडे होते त्यामुळे शौचास जोर द्यावा लागू शकतो. काही औषधांमुळे बद्धकोष्ठ होतो. अशी औषधे घेणे शक्यतो टाळावे. वजन नियंत्रणात ठेवावे.

• नियमित व्यायाम केल्यामुळे बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते, रक्तदाब कमी होतो आणि वजन कमी होण्यास मदत होते.

या बदलांमुळे मूळव्याध होण्याचा किंवा पुन्हापुन्हा होण्याचा धोका कमी होऊ शकतो. आपल्या डॉक्टरांनी सांगितलेले औषधोपचार वेळेवर घेणे.‌ मलम गुदद्वाराजवळ आणि आत लावल्यास आपल्याला लक्षणांची तीव्रता कमी होण्यास मदत होते तसेच शौच करणे सुलभ होते.

what is piles, Mulvyadh symptoms in Marathi
Health food for mood swings : अचानक भूक लागते? मूड खराब झाला आहे? तर या पदार्थांचे सेवन करा मिनिटांत होईल बदल

उपचार -

बऱ्याचदा मुळव्याधावर काही घरगुती पध्दतीने उपचार करता येतो. परंतु, ही समस्या अधिक गंभीर असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मुळव्याधीची सुरूवात असल्यास तुम्ही काही उपाय आणि आहारात बदल करून मुळव्याधीपासून नक्कीच सुटका मिळवू शकता.

१. दररोज रात्री कोमट पाण्यात त्रिफळ चूर्ण घ्या. हे पाणी प्यायल्याने पोट साफ होण्यास मदत होईल व बध्दकोष्ठतेचा त्रास होणार नाही.

२. अशावेळी अपचनाची समस्या होत असल्यास ताक पिणे फायदेशीर ठरेल. दररोज दुपारी ताकासोबत सैंधव मीठ व जिरेपूड घेतल्यास आराम मिळेल.

३. रात्रीचे हलके जेवण करा. झोपण्याआधी कमीत कमी दोन तास जेवा. ज्यामुळे झोपताना पचनसंस्थेवर ताण पडणार नाही.

४. नियमित मुबलक पाणी पिण्याने तुमचे शरीर हायड्रेट राहते. शरीराचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी शरीराला पुरेश्या पाण्याची गरज असते. पाणी भरपूर पिण्याने तुमच्या शरीराच्या सर्व क्रिया सुरळीत होतात. अपचन कमी झाल्याने मुळव्याधीची समस्या कमी होते..

५. काकडी, बीट, गाजर, मुळा अशा सॅलेड अथवा कोशिंबीर खाण्याने आपल्या शरीराला पुरेशे फायबर मिळतात. मुळव्याध कमी होण्यासाठी शरीराला भरपूर प्रमाणात फायबर मिळतील याची काळजी घ्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com