
PIB Fact Check : हल्ली सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज काही ना काही तरी व्हायरल होत असते. अशातच व्हॉट्सअॅप ग्रुपवरुन एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये मोफत मोबाईल रिचार्ज देण्याचा दावा केला जात आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की मोदी सरकार देशातील प्रत्येक यूजरला 239 रुपयांचे फ्री रिचार्ज देत आहे. या रिचार्जची वैधता 28 दिवसांची आहे. या मेसेजचे सत्य काय आहे ते जाणून घेऊया.
या व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, लोकांना मोफत मोबाईल रिचार्ज देण्यात येत आहे जेणेकरून ते २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान करतील.
या मेसेजमध्ये सांगण्यात आले आहे की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑफर केलेल्या मोफत मोबाइल योजनेत लोकांना 28 दिवसांसाठी 239 रुपयांचे फ्री रिचार्ज (Recharge) देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. तुम्हालाही रिचार्ज करायचे असल्यास, तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ते करू शकता. लिंकवर क्लिक करून तुम्हाला २८ दिवसांसाठी फ्री रिचार्ज मिळेल.
1. येथे क्लिक करा
या मेसेजवर पब्लिक इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB)ने आपले स्पष्टीकरण दिले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, व्हायरल झालेला हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे.
2. PIB Fact Check : हा व्हायरल झालेला मेसेज पूर्णत: खोटा आहे
पीआयबी फॅक्ट चेकने मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. पीआयबीने सांगितले की, सरकारने अशी कोणतीही मोफत मोबाइल रिचार्ज ऑफर किंवा मेसेज दिलेला नाही. त्याच्या पीआयबीने ट्विटरवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यामध्ये केंद्र सरकारने कोणताही फ्री मोबाइल (Mobile) रिचार्ज देत नसल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी पीआयबीने आपला व्हॉट्सअॅप क्रमांक (Number) आणि ईमेल आयडी शेअर केला आहे, ज्यावर वापरकर्ते बनावट संदेशांबद्दल तक्रार करू शकतात.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.