Propose Day : प्रपोज डे ची सुरुवात कशी झाली ? 'हा' दिवस प्रेमीयुगुलांसाठी अधिक खास का ? जाणून घ्या

8 फेब्रुवारीला प्रपोज डे का साजरा केला जातो ,त्याची सुरुवात ,कधी आणि कशी झाली?
Propose Day
Propose DaySaam Tv

Propose Day : प्रेमाचा महिना फेब्रुवारी. प्रियकर आणि प्रियसी व्हॅलेंटाईन वीकमध्ये आनंदाने मनातील भावना एकमेकांना सांगत असतात. खर तर प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण वर्षभरात कधीही करू शकतो पण फेब्रुवारी महिना हा खास प्रेम व्यक्त करण्यासाठी ओळखला जातो.

हल्ली खूप जास्त प्रमाणात व्हॅलेंटाईन विक साजरा केला जातो. त्यातील दिवस हा प्रपोज डे म्हणून ओळखला जातो. या दिवशी आवडत्या व्यक्तीला प्रपोज करून हा दिवस साजरा करतात. पण 8 फेब्रुवारीला प्रपोज डे का साजरा केला जातो ,त्याची सुरुवात ,कधी आणि कशी झाली? हे कोणालाच माहीत नसेल तर आज त्याबद्दल जाणून घेऊया.

Propose Day
Propose Day : प्रपोज करण्याचा विचार करताय ? असा प्लान केला तर, होकार नक्कीच मिळेल !

प्रपोज डेला बरेच लोक जोडीदाराबद्दलचे (Partner) आपले प्रेम व्यक्त करत असतात. तर काही जण त्याची नात्यांची सुरुवात प्रपोज डे पासून करतात. नवनवीन प्रकारे मनातील भावना सांगण्याचा प्रयत्न करतात हा दिवस खास बनवण्यासाठी बरेच लोक डिनर प्लान करतात किंवा समोरच्या व्यक्तीला आवडतील असे प्लान बनवतात. सर्व प्रपोज डेलाच का व्यक्त करतात आम्ही तुम्हाला सांगतो.

प्रपोज डे ची सुरुवात कशी झाली

प्रपोज डेची सुरुवात जॉन मायकल ओ’लॉफलिन यांनी केली होती. त्यामागची गोष्ट म्हणजे त्यांच्या भावाचे एका मुलीवर प्रेम होते पण तो प्रेम व्यक्त करू शकत नव्हता प्रेम व्यक्त न करताच आयुष्य सोडून गेले. म्हणून प्रेमात भाऊ गमावल्यानंतर या दिवशी सुट्टी घोषित करण्यात आली तेव्हापासून हा दिवस प्रपोज डे म्हणून साजरा (Celebrate) करण्याची परंपरा सुरू झाली.

Propose Day
Propose Day Wishes : मनातल्या भावना व्यक्त करताना भीती वाटते ? याप्रकारे पल्या खास व्यक्तीला करा Propose

जे कोणावर तरी प्रेम करतात पण प्रेम व्यक्त करण्याची हिंमत होत नाहीत खास अशा लोकांसाठी हा दिवस आहे. एखाद्या व्यक्तीवर प्रेम करण्यासोबतच त्याच्यासमोर प्रेम (Love) व्यक्त करणेही तितकेच गरजेचे असते या दिवसाचा आधार घेऊन अनेक लोक आपले प्रेम व्यक्त करतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com