Railway Recruitment 2022 : आता 10 वी पास उमेदवारांना मिळणार रेल्वेमध्ये सरकारी नोकरी, असा कराल अर्ज

तुम्हीही भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहत असाल तर तयार व्हा कारण रेल्वेने पुन्हा एकदा भरती सुरू केली आहे.
Railway Recruitment 2022
Railway Recruitment 2022Saam Tv

Railway Recruitment 2022 : रेल्वेत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. रेल्वे भरती मंडळाकडून वेळोवेळी रेल्वेमधील नोकऱ्यांसाठी अधिसूचना जारी केल्या जातात. जर तुम्हीही भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहत असाल तर तयार व्हा कारण रेल्वेने पुन्हा एकदा भरती सुरू केली आहे. या नोकरीसाठी 10वी आणि 12वी उत्तीर्ण पदवीधर देखील अर्ज करू शकतात.

1. रेल्वेत नोकरीची संधी

  • दक्षिण रेल्वेने अलीकडेच पे मॅट्रिक्स लेव्हल 2/3 आणि लेव्हल 4/5 अंतर्गत भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

  • यासाठी पात्र असणारे उमेदवार दक्षिण रेल्वे भर्ती 2022 साठी अधिकृत वेबसाइटवर 2 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

  • या पदांच्या भरतीसाठी ३ डिसेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

Railway Recruitment 2022
Job Interview Tips : जॉब इंटरव्ह्यूसाठी जाताय ? 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवल्या तर, नोकरी मिळेल नक्की !

2. या पदांवर भरती

  • रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे, स्तर 4/5 अंतर्गत 5 पदे आणि स्तर 2/3 अंतर्गत 16 पदे भरली जातील.

  • लेव्हल 2 वर निवडलेल्या उमेदवारांना 19900 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.

  • तर, लेव्हल 3 साठी 21700 रुपये, लेव्हल 4 साठी 25500 रुपये आणि लेव्हल 5 साठी 29200 रुपये प्रति महिना पगार (Salary) असेल.

  • पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास, उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता 10 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

  • याशिवाय, नोकरीसाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.

  • लक्षात ठेवा वयोमर्यादेत कोणतीही सूट दिली जाणार नाही.

  • पात्रतेशी संबंधित तपशीलवार माहितीसाठी, तुम्ही अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेली अधिसूचना देखील तपासू शकता.

3. भारतीय रेल्वे नोकऱ्या 2022 :

  • रेल्वेत (Railway) ही भरती स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत केली जात आहे.

  • पात्र उमेदवार दक्षिण रेल्वे भरती 2022 साठी अधिकृत वेबसाइटवर 2 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

  • यासाठी 500 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल. अधिक तपशीलांसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट देखील तपासू शकता.

4. रिक्त जागा

  • जबलपूर विभाग - 884

  • भोपाळ विभाग - 614

  • कोटा विभाग - 685

  • कोटा कार्यशाळा विभाग - 160

  • CRWS BPL विभाग - 158

  • मुख्यालय/जबलपूर विभाग - 20

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com