Relationship Tips : पार्टनरसोबत भांडण झालंय? 'या' पध्दतीने संबंध बनवा,निवळेल राग

आपण एक असा मार्ग बघणार आहोत ज्याने भांडण तर मिटून जाईलच पण याशिवाय पार्टनरसोबत कधीही न अनुभवलेले काही सुखद क्षणही अनुभवता येतील.
Relationship Tips
Relationship TipsSaam Tv

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये जोडप्यांमध्ये भांडणं होत नाहीत असं कधीही होत नाही. नात्यातील जवळीक टिकवून ठेवायची असेल तर छोटीमोठी भांडणे ही व्हायलाच हवीत. पण त्याचवेळी रुसव्याफुगव्याने रिलेशन खराब होऊ नयेत, याचीही काळजी घ्यावी.

रिलेशनशिपमध्ये (Relation) दोघांनीही समजूतदारपणा दाखवणे आवश्यक आहे. भांडणं सोडवण्यासाठी काहीजण शांततेचा तर काही जण संवादाचा मार्ग निवडतात. पार्टनरसोबत कधीही न अनुभवलेले काही सुखद क्षणही अनुभवण्यासाठी आपण काही गोष्टी जाणून घेऊया.

Relationship Tips
Relationship Tips : तुमच्या जोडीदाराच्या वागण्यात 'हे' बदल दिसताय, तर होतेय तुमच्या सोबत फसवणूक !

आपण एक असा मार्ग बघणार आहोत ज्याने भांडण तर मिटून जाईलच पण याशिवाय पार्टनरसोबत कधीही न अनुभवलेले काही सुखद क्षणही अनुभवता येतील. हा मार्ग म्हणजे सेक्स, काही कपल्सशी साधलेल्या संवादात त्यांनी सांगितले की, जेव्हा कधी ते भांडणानंतर सेक्स करतात तेव्हा दोघांचाही राग निवळून जातो आणि शारीरिक सुख देखील मिळते. भांडणानंतर शारीरिक सुख यासाठी काही टिप्सकडे लक्ष द्यावे लागेल, काय आहेत या टिप्स?

किसिंग -

काही वेळा आपला पार्टनर (Partner) भांडत असताना त्याने एकदाच तोंड बंद करावं असं वाटतं हो ना? त्यासाठी त्याला/तिला किस करून एकाच दगडात दोन पक्षी मारता येतील, या पॅशनेट किसनंतर आपल्या पार्टनरचा राग शांत होईलच, पण भांडण कशावरून झालं हे देखील तो विसरून जाईल.

पुढाकार घ्या -

भांडणाचा किंवा अन्य कोणत्याही गोष्टीचा परिणाम आपल्या सेक्स लाईफवर होऊ द्यायचा नसेल तर दोघांपैकी एकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. इगो बाजूला ठेवून आपल्या पार्टनरला जवळ घ्या.

Relationship Tips
Relationship Tips : बरेच पुरुष गर्लफ्रेंड किंवा पत्नीशी 'या' आठ गोष्टींबाबत खोटं सांगतात, तुमच्यासोबत 'असं' काही घडतंय का?

डर्टी टॉक -

कोणत्याही गोष्टीवरून आपल्या जोडीदारावर नाराज असाल अथवा रागावला असाल पण आपल्याला भांडण वाढवायचा मूड नसेल तर जोडीदाराबरोबर डर्टी टॉक सुरू करू शकतो. पार्टनरला अशा स्वरूपाचं बोलणं आवडतंच. असं बोलणं सुरू झाल्यानंतर आपला जोडीदार राग विसरून अधिक फ्रेश होतात.

जोडीदाराबरोबर नेहमीप्रमाणे सेक्स टॉक करून त्यांना उत्तेजित करून त्यांचा राग कमी करू शकतो. यामध्ये भांडणाचा विषय बाजूला राहातो. तसंच भांडण असेल तर जोडीदारासाठी कोणत्याही प्रकारचा अपशब्द वापरू नका. शिवाय आपल्या जोडीदाराला नक्की कोणत्या प्रकारचं सेक्स टॉक आवडतं ते नक्कीच माहीत असणार त्यामुळे मुलगा असो वा मुलगी. त्याचप्रमाणे डर्टी टॉक अधिक चांगलं होईल याचा प्रयत्न करून समोरच्याचा मूड बदलण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो.

Relationship Tips
Menstruation: तिची पाळी व शरीरसंबंध योग्य की, अयोग्य ? त्याचा शरीरावर होणारा परिणाम ? त्यामुळे फायदा होतो की, नुकसान

हार्मोन्स पण होतात आनंदी -

राग आणि नाराज असलेल्या जोडीदाराबरोबर पॅचअप केल्यानंतर हार्मोन्स पण आनंदी होतात. त्यानंतर एका वेगळ्या दिशेने हार्मोन्स काम करू लागतात.

त्याचवेळी आपल्या जोडीदारासह आपली जवळीक अधिक वाढते. जर भांडण अधिक प्रमाणात झालं असेल तर अशावेळी सेक्स करा म्हणजे भांडण जास्त वेळ नक्कीच राहणार नाही. याचवेळी हॅप्पी हार्मोन्सचा फायदा उचलून एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडून जायला हवं. कारण यावेळी मिळणारा आनंद हा सुखावह असतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com