World Laughter Day 2023 : हसा हसा आणखीन हसा... जागतिक हास्य दिनाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

World Laughter Day : जागतिक हास्य दिन दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.
World Laughter Day 2023
World Laughter Day 2023Saam Tv

Laughter Day : जागतिक हास्य दिन दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. लोकांना हसण्याची जाणीव व्हावी हा हा उत्सव साजरा करण्यामागचा उद्देश आहे. हसणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

माणसाने नेहमी हसले पाहिजे. कारण हसण्याने माणसातील बालिशपणा जागृत होतो तसेच मनाला शांती मिळते. यावर्षी 7 मे रोजी जागतिक हास्य दिन साजरा केला जाणार आहे. जागतिक हास्य दिन का साजरा (Celebrate) केला जातो ते जाणून घेऊया.

World Laughter Day 2023
World Hand Hygiene Day: तुम्ही हात धुण्यासाठी कशाचा वापर करता ? साबण की, लिक्विड ? सतत हात धुणे योग्य आहे का ?

इतिहास -

आपणास सांगूया की जागतिक हास्य दिनाची सुरुवात भारतात (India) झाली. 10 मे 1998 रोजी मुंबईत पहिल्यांदा साजरा करण्यात आला. जागतिक हास्य दिनाची सुरुवात लाफ्टर योग चळवळीचे संस्थापक डॉ. मदन कटारिया यांनी केली. तेव्हापासून दरवर्षी मे महिन्याचा पहिला रविवार हा जागतिक हास्य दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश हास्याद्वारे लोकांमध्ये बंधुभाव वाढवणे हा आहे.

महत्त्व -

डॉक्टरांच्या मते प्रत्येक माणसाने हसणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक माणूस हसल्याशिवाय अपूर्ण असतो. हसल्याने रक्तातील साखरेची (Sugar) पातळी कमी होते. याशिवाय हसल्याने मनाला शांती मिळते. हसल्याने वेदना कमी होतात.

World Laughter Day 2023
World Password Day 2023 : ऑनलाइनच्या जगात सुरक्षित राहण्यासाठी 'लव्ह यू शोना'सारखे पासवर्ड लगेच होतील हॅक..! पाहा 'या' टिप्स

थीम -

दरवर्षी वेगळ्या थीमने जागतिक हास्य दिन साजरा केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी हशा पिकवण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. लोकांना हसावे आणि आनंदी व्हावे या उद्देशाने जागतिक हास्य दिनाची थीम साजरी केली जाते.

World Laughter Day 2023
Indian Marriage Rituals | लग्नात मुंडावळ्या आणि बाशिंग का बांधतात?

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com