Side Effects Of Sugar : विषापेक्षा कमी नाही साखर, अधिक सेवन केल्यास खराब होतील 'हे' 7 अवयव !

प्रत्येक आनंदाला वाढवणारा गोड पदार्थ तुमच्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते.
Side Effects Of Sugar
Side Effects Of SugarSaam Tv

Side Effects Of Sugar : कोणतीही आनंदाची बातमी द्यायची असेल तर तोंड गोड करुन आपल्याला ती सांगतात. एखादी गोष्ट तोंड गोड करत समोरच्याला सांगणे ही भारताची परंपरा आहे. परंतु, प्रत्येक आनंदाला वाढवणारा गोड पदार्थ तुमच्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते.

प्रत्येक गोड पदार्थांमध्ये साखर असते. साखर ही आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असते. चला तर मग जाणून घेऊया साखरेमुळे कोणते आजार तुम्हाला जडू शकतात.

Side Effects Of Sugar
No Sugar Challenge : महिनाभर साखरेचे सेवन न केल्यास आरोग्याला होतील का अनेक फायदे? जाणून घ्या, तज्ज्ञांचे मत

न्यूट्रिशनीस्ट भक्ती कपूर यांनी त्यांचे इंस्टाग्राम हॅण्डलवर पोस्ट करत सांगितले की, ब्रेड, प्रोटीन बार, ब्रेकफास्ट सिरील, केचप, योगट यांसारखं पदार्थांचे सेवन करत असाल तर वेळीच सावधान व्हा. या सगळ्या पदार्थांमध्ये गरजेपेक्षा जास्त साखरेचे प्रमाण असते. साखरेच्या जास्त सेवनाने तुमच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये उलथापालत होऊ शकते. यामुळे तुम्हाला हृदयविकाऱ्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्याचबरोबर लिव्हर आणि मेंदू संबंधीच्या आजारांना (Disease) देखील इजा पोहोचू शकते.

1. साखरेच्या जास्त सेवनाने होऊ शकतो मेंदूचा त्रास :

साखर ही एका नशेली पदार्थासारखी असते. जो मेंदूचे कार्यक्षमतेला प्रभावित करतो. जास्त प्रमाणात साखरेच्या सेवनाने तुम्हाला ब्रेन फोग, काळजी, डोकेदुखी (Headache), लो एनर्जी, चक्कर येणे, चिडचिडपणा, क्रेविंग अशा प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. एवढंच नाही तर तुम्हाला अल्जायमर हा रोग होण्याची देखील शक्यता असते.

2. तुमच्या डोळ्यांची चमक जाऊ शकते :

हाय ब्लड शुगर हे शरीरामधील प्रत्येक रक्तवाही केला नकारात्मक रूपमध्ये प्रभावित करत असतो. हाय ब्लड शुगरमुळे तुम्हाला अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागू शकते. उच्च रक्तदाबामुळे तुमचे डोळे कमजोर पडू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला कमी दिसणे, मोतीबिंदू, ग्लुकोमा आणि रेटीनोपैथी यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. बऱ्याचदा मधुमेह रुग्णांना अंधत्व देखील येऊ शकते.

Side Effects Of Sugar
Side Effects Of Sugarcanva

3. साखरेचे वाढते प्रमाण तुमच्या शरीरामध्ये सूज निर्माण करू शकते :

साखर (Sugar) आपल्या शरीरामधील इन्सुलिनचे प्रमाण वाढवते. जे सुजणे, पिंपल्स, रोसेसिया, सोरायसिस आणि एक्झिमा यांसारख्या गंभीर समस्यांना पाठपुरावा करते. त्याचबरोबर साखर ही आपल्या शरीरामधील कोलेजनला तोडून चेहऱ्यावरील सुरकुत्या निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्याला कोणतीही ऍलर्जी देखील होऊ शकते.

4. साखरेच्या जास्त सेवनाने हिरड्या होऊ शकतात खराब :

साखरेचे सेवन हे दातांच्या आणि हिरड्यांच्या आरोग्यास हानिकारक असते. त्याचबरोबर साखरेच्या सेवनाने तुमच्या हिरड्या सडू देखील शकतात. जास्त प्रमाणात गोड खाल्ल्याने दातांमध्ये आणि हिरड्यांमध्ये बॅक्टेरिया जमा होतो. तो खराब बॅक्टेरिया तुमच्या पोटामध्ये देखील जाऊ शकतो. जेणेकरून तुम्हाला विविध प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागू शकते.

5. साखरेच्या प्रमाणामुळे हृदय पडू शकते आजारी :

साखरेच्या सततच्या सेवनाने आमचे हृदय आजारी पडू शकते. जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने तुमच्या शरीरामधिल धमन्या अकडून जातात. जेणेकरून याचा सरळ प्रभाव तुमच्या हृदयावर होतो. साखर मॅग्नेशियम सारख्या खनिजांना कमी करते. जे हृदय स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक असते. कारण की साखर शरीरामधील इन्सुलिन वाढवते ज्यामुळे हाय बीपी, हार्ट डीजिज, डायबिटीज, हृदयविकार आणि स्ट्रोक यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू लागतो.

Side Effects Of Sugar
Side Effects Of Sugarcanva

6. गोड खाल्ल्याने तुमच्या आतड्यांवर बॅक्टेरिया जमा होऊ शकतो :

गोड पदार्थ आजारी पडण्यासाठी कारण बनणाऱ्या खराब बॅक्टेरियांसाठी अन्नाचे काम करते. अशातच जास्त प्रमाणात गोड खाल्ल्याने आतड्यांवरती चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियांचे संतुलन बिघडते. ज्यामुळे कमजोर इम्युनिटी, सुजन आणि पोषक तत्वांच्या खराब अवशोषणचे प्रमाण वाढते.

7. फॅटी लिव्हरची समस्या :

जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने तुमचे लिव्हर खराब होऊ शकते. साखरेचे प्रमाण जास्त झाल्याने तुमच्या लिव्हरमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याचबरोबर तुमचे वजन देखील वाढते. म्हणून साखरेचे फार कमी प्रमाणात केले पाहिजे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com