Tax Slab Change : सर्वसामान्यांसाठी होणार दोन Tax सिस्टम; बजेटवर होईल का परिणाम ?

२०२४ मध्ये सादर केला जाणारा अर्थसंकल्प हा नवीन धोरणांनुसार असेल.
Tax Slab Change
Tax Slab Change Saam Tv

Tax Slab Change : पुढील वर्षाचा अर्थसंकल्प हा २०२४ च्या होणाऱ्या निवडणूकीपूर्वीच्या आधीचा अर्थसंकल्प असेल. २०२४ मध्ये सादर केला जाणारा अर्थसंकल्प हा नवीन धोरणांनुसार असेल. त्यासाठी निवडणुकीपूर्वी सरकार जनतेला अनेक सवलती देऊ शकेल, अशी अपेक्षा आहे.

या सवलती जाहीर करण्यापूर्वी, सरकार अर्थसंकल्पात त्या योजनांवर अधिक लक्ष केंद्रित करेल ज्यासाठी 2022 चे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. जसे की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, सर्वांना घरे देणे. कोरोनामुळे ही उद्दिष्टे साध्य करण्यात सरकारला उशीर झाला, त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात प्रथम अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी सरकार (government) यावर लक्ष केंद्रित करु शकते.

Tax Slab Change
Best Bike Helmet : तुम्ही बाईक चालवताय? मग १००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत इथून घ्या हेल्मेट

सरकार देईल टॅक्समध्ये सूट

या अर्थसंकल्पातc(Budget) टॅक्स स्लॅबमध्येही बदल करण्यात येणार असल्याचे संकेत महसूल सचिव तरुण बजाज यांनी निवृत्तीपूर्वी दिले आहेत. मात्र जुन्या टॅक्समध्ये हे बदल केले जाणार नाहीत. जर हे बदल केले गेले तर सरकार 2020 मध्ये आणलेल्या नवीन टॅक्समध्ये करेल. याचे कारण सरकारच्या अपेक्षेप्रमाणे लोकांनी नवीन टॅक्स स्वीकारलेले नाही. अशा परिस्थितीत या नव्या प्रणालीमध्ये अधिकाधिक लोकांना जोडून, ​​जुनी टॅक्सची पद्धत रद्द करून एकच पद्धत सुरू ठेवण्याच्या योजनेवर सरकार हळूहळू पुढे जाण्याची शक्यता आहे.

टॅक्स स्लॅबमध्ये होणार का बदल

सध्या कर आकारणीच्या दोन प्रणाली आहेत. पहिली पद्धत, ज्याला जुनी प्रणाली म्हणतात, 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नाही. याशिवाय, 80C अंतर्गत, 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कर जमा करण्यापासून सूट आहे. यानुसार, सुमारे 6.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. अशा परिस्थितीत, निवृत्तीपूर्वी महसूल सचिव तरुण बजाज यांनी सुचवले आहे की, सूट दिल्यानंतर, जर 6.5 लाखांपर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त असू शकते, तर त्याऐवजी करप्रणाली अशी असावी की, 6.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर सूट नसतानाही करमुक्त होऊ शकतो.

जुनी टॅक्स पद्धत संपणार का?

तरुण बजाज यांच्या मते, जुन्या करप्रणालीत लोकांना नियोजनाचा लाभ मिळतो. परंतु असे अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी पैसे नाहीत आणि त्यांना कर भरावा लागतो. त्याच वेळी, नवीन कर प्रणालीमध्ये, सूट नसल्यामुळे कर भरण्यावर आधीच निर्बंध आहे, त्यामुळे ते देखील करदात्यांना कोणत्याही प्रकारे फायदेशीर नाही. बजाज म्हणतात की, यावर चर्चा केली जात आहे आणि त्यांना आशा आहे की त्यांच्यानंतर या पदाचा कार्यभार स्वीकारणारे अधिकारी हे मुद्दे समजून घेतील

नवीन टॅक्स पद्धत लोकप्रिय कशी होईल?

आता प्रश्न असा पडतो की, नवीन टॅक्स पद्धत लोकप्रिय कसे करता येईल. यासाठी नवीन टॅक्स पद्धत किमान कर स्लॅब 2.5 लाखांवरून 7 लाखांपर्यंत वाढवावा, असे बजाज यांनी सुचवले. त्यासाठी आधी साधी टॅक्स पद्धत करावी लागेल, त्यासाठी साधे गणितही चालेल, ज्यामध्ये मर्यादा वाढवून महसुलावर किती परिणाम होईल हे पाहाता येईल. त्यानुसार कर स्लॅबची मर्यादा निश्चित करून लोकांना दिलासा देता येईल आणि कर संकलन वाढवण्यावरही भर दिला जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com