Relationship Tips : तुमच्या 'या' 4 सवयीमुळे दुरावू शकतो पार्टनर, वेळीच घ्या काळजी !

आपल्या एखाद्या सवयीमुळे नात्यांमध्ये सारखे सारखे दुरावे येताय का?
Couple Relationship Tips
Couple Relationship TipsSaam Tv

Couple Relationship Tips : एक नात जेव्हा सुरू होत तेव्हा त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीं देखील अत्यंत गरजेचे असतात. जर तुम्ही या गोष्टींवर लक्ष दिले नाही तर तुमचं नातं तुटू शकत. पार्टनर सोबत राहताना अनेक गोष्टीं पहिल्यांदाच समोर येतात.

या कारणामुळे तुम्ही काही गोष्टींना बॅलन्स नाही करू शकत. नात्यांमध्ये जेव्हा तुम्ही एक परफेक्ट बॅलन्स बनवू शकत नाही, तर बऱ्याचदा तुमचा पार्टनर तुमच्यापासून लांब जाण्याची शक्यता असते.

त्यामुळे तुम्हाला या गोष्टीकडे लक्ष द्यायचे आहे की आपल्या एखाद्या सवयीमुळे नात्यांमध्ये सारखे सारखे दुरावे येताय का? तुमच्याच काही सवयी तुमच्या सुखी जीवनाची वाट लागत आहे का? हे कसे ओळखाल जाणून घेऊया

Couple Relationship Tips
Relationship Tips : पहिल्यांदाच डेटवर जाताय ? 'या' 5 जागांवर जाऊच नका !

1. नकारात्मक स्वभाव खराब करू शकते नाते :

रिलेशनशिपसाठी (Relationship) तुम्हाला पॉझिटिव्हिटीने भरलेले असले पाहिजे. जर तुमचं बिहेवियर निगेटिव्ह असेल तर, तुमच्या पार्टनरला तुम्ही इरीटेट वाटू शकता. त्याचबरोबर तुमचा पार्टनर तुमच्या पासून लांब जाण्याचा निर्णय घेईल. पार्टनर सोबत नेहमी चुकीच्या पद्धतीने व्यवहार आणि त्यांच्यासमोर सतत रडणे हे तुम्हाला भारी पडू शकते.

तुमच्या मूडनुसार त्यांच्यासोबत वागणे बंद करा. तुम्ही तुमचा प्रॉब्लेम जरूर सांगा, परंतु त्याची सुद्धा एक पद्धत असते. तुमचा चिडचिडेपणा आणि तुमचा राग तुमच्या पार्टनरवरती (Partner) काढू नका.

Couple
Couplecanva

2. स्वतःला दोषी ठरवू नका :

प्रत्येकाच्या आयुष्यात कोणता ना कोणता प्रॉब्लेम असतो. असा कोणताच व्यक्ती नाही द्यायच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्ही प्रॉब्लेम्समुळे स्वतःलाच दोष देत असाल तर, तुमची आतल्याआत घुसमट होईल.

तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे आणि आयुष्यामध्ये आणि येणाऱ्या समस्यांना सामोरे गेले पाहिजे. त्याचबरोबर पार्टनरसोबत बोलताना लाईफ व्यतिरिक्त जवळच्या गोष्टींबद्दल देखील बोलले पाहिजे.

Couple Relationship Tips
Relationship Tips : 'या' 4 गोष्टींवरुन कळेल तुमचा पार्टनर रिलेशनशिपमध्ये इंटरेस्टेड आहे की नाही?

3. तुम्हाला नाही बोलण्याची सवय नसेल तर :

सगळ्यांसाठी चांगला विचार करणे आणि चांगलं होण्याची आशा करणे ही अतिशय चांगली गोष्ट आहे. परंतु तुम्ही याचा विचार करता की आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण खुश ठेवू शकतो का. तर हे अजिबात शक्य नाही आहे.

तुम्ही किती प्रयत्न केला तरी सगळ्यांना खुश ठेवणे हे तुम्हाला जमणार नाही. असं केल्याने तुम्ही अनेकदा तुमच्या मित्राबरोबर किंवा मैत्रिणीबरोबर (Friend) वैर करून बसता. याचा परिणाम तुमच्या नात्यावर होऊ शकतो. त्यामुळे या सवयीला लवकरात लवकर बदला.

4. आपल्या आनंदासाठी दुसऱ्याला दोष का द्यावा?

जेव्हा तुम्ही नातेसंबंधात प्रवेश करता तेव्हा हे उघड आहे की तुम्ही तुमच्या जोडीदारावर अवलंबून राहण्यास सुरुवात करता, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या आनंदाची चावी त्यांच्या हातात द्याल.

त्याचबरोबर तुमच्या नात्याची इतरांशी कधीही तुलना करू नका, अन्यथा तुमची ही सवय तुम्हाला भारी पडू शकते. अनेकांना अशी सवय असते की इतर लोकांमुळे ते स्वतःच्या जोडीदाराला शिव्या देऊ लागतात. जे पार्टनरला अजिबात आवडत नाही. तुमच्या छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com