Jaundice Disease : कावीळची समस्या दूर करण्यासाठी 'हे' 5 ज्यूस ठरतील फायदेशीर

Jaundice symptoms : जर तुम्ही सुद्धा कावीळ या आजाराने ग्रस्त आहात तर, डाएटमध्ये हे पदार्थ सामिल करून तूम्ही तुमचा आजार कंट्रोलमध्ये ठेवू शकता.
Jaundice Disease
Jaundice DiseaseSaam Tv

Which Juice To Drink In Jaundice : कावीळ हा आजार संक्रमणामुळे होत असल्याचं पाहायला मिळत. खरतर, हा आजार दूषित पाणी आणि अन्न खाल्ल्यामुळे होतो. जर वेळेवर या आजाराकडे लक्ष दिले नाही तर, रोग्यासाठी गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते.

या आजारामध्ये (Disease) लिव्हर व्यवस्थित काम करत नाही आणि भूक सुध्दा कमी लागते, त्वचेचा रंग पिवळा होतो. जर तुम्ही सुद्धा कावीळ या आजाराने ग्रस्त आहात तर, डाएटमध्ये (Diet) हे पदार्थ सामिल करून तूम्ही तुमचा आजार कंट्रोलमध्ये ठेवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा काही ज्यूस बद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा कावीळ लवकर ठीक होईल.

Jaundice Disease
Myeloma Disease : 'ही' सांधेदुखी नाहीतर आहे 'सायलेंट आजार' ! यामुळे महिलांची हाडे होतात ठिसूळ

1. मुळ्याचा रस :

कावीळ झालेल्या रोग्यांसाठी मुळ्याचा रस अत्यंत फायदेशीर असतो. यामध्ये उपलब्ध असलेले सोडियम, फॉस्फरस, आणि व्हिटॅमिन (Vitamins) ए सारखे पोषकतत्व शरीराला कोणत्यापण आजारांपासून वाचवण्यासाठी मदत करतात. हा ज्युस तयार करण्यासाठी मुळ्याच्या पानांना पाण्यामध्ये टाकून उकळवून घ्या. जेव्हा पाणी कोमट होईल तेव्हा जुसचे सेवन करा.

2. उसाचा रस :

उसाचा रस कावीळ रुग्णांसाठी एका वरदान प्रमाणे आहे. हा ज्युस लिव्हर मजबुत करण्यासाठी मदतगार असतो. तुम्ही तुमच्या डाएटमध्ये उसाचा रस जरूर शामील करा. जेणेकरून तुमचा आजार लवकर बरा होईल.

Jaundice Disease
Mental Stress Disease : मानसिक तणावामुळे वाढतोय जीवघेण्या आजारांचा धोका !

3. आवळ्याचा रस :

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. आवळा हा शरीरातील विषारी पदार्थांना बाहेर टाकतो. जर तुम्ही सुद्धा कावीळ या आजाराने ग्रस्त असाल तर तुम्ही दररोज आवळ्याचे सेवन केले पाहिजे.

4. टोमॅटोचा रस :

टोमॅटोमध्ये (Tomato) व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, लायकोपिन यासारखे पोषक तत्व उपलब्ध असतात. हे कावीळच्या रोगांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. यासाठी टोमॅटोचा रसामध्ये संधैव मीठ आणि काळी मिरीपूड मिक्स करा. तुम्ही दररोज सकाळी अनोशीपोटी या रसाचे सेवन करू शकता.

Jaundice Disease
Urine Disease : तुमच्या लघवीच्या रंगावरुन ओळखा आजारपण !

5. लिंबूचा रस :

लिंबू हा व्हिटॅमिन सी आणि एंटीऑक्सीडेंटचा एक रीच रोर्स मानला जातो. अशातच लिंबू हा लिव्हरला डिटॉक्स करण्याचे काम करतो. ज्या व्यक्तींना कावीळची समस्या आहे त्यांनी नियमित रूपाने कोमट पाण्यामध्ये लिंबूचा रस मिसळून प्यावा. तुम्ही हवं तर यामध्ये संधैव मीठ आणि काळी मिरीपूड देखील टाकू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com