Twitter Blue Tick Removed Memes
Twitter Blue Tick Removed MemesSaam Tv

Memes On Twitter Blue Tick: 'सबका Blue Tick रिमूव करेगा तेरा इलॉन...' ट्विटरवरुन मीम्सचा पाऊस !!!

Blue Tick : आधी रात की आजादी ब्लू टिक ग़ायब यूजर्सने लिहिले.

Twitter Blue Tick memes : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरचे सीईओ एलोन मस्क यांनी त्यांच्या घोषणेनुसार लेगसी व्हेरिफाईड अकाउंटवरील ब्लू टिक्स काढून टाकले आहेत. 20 एप्रिलनंतर ज्यांनी पेड सब्सस्क्रिशन घेतले नाहीत, त्यांची ब्ल्यू टिक हटवली जाईल, असं इलॉन मस्क यांनी म्हटलं होतं. त्यानुसार गुरुवारी रात्री 12 वाजल्यापासूनच ब्लू टिक हटवण्यात आली आहे.

यानंतर ट्विटरच्या ब्लू टिकसाठी पैसे (Money) मोजावे लागतील. कंपनीच्या निर्णायानंतर ट्विटरवर #BlueTick, #BlueCheck, #TwitterBlue असे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले. युजर्स या हॅश टॅगसह विविध प्रकारचे मीम शेअर करत आहेत.

Twitter Blue Tick Removed Memes
Twitter Blue Tick Removed: ट्विटरने कोणालाही सोडलं नाही! एका रात्रीत सगळं बदललं; एलॉन मस्कचा मोठा निर्णय

ब्लू टिक निघून गेल्यानंतर यूजर्स आपापल्या स्टाईलमध्ये भावना व्यक्त करत आहेत. काही म्हणतात - इलॉन मस्क (Elon Musk) तर खेळला तर काही म्हणतात ट्विटर पर आज मौसम बड़ा Blue है... हम तो थे ही.. अब सब बिना Blue हैं... चला तर मग पाहूया अशाच काही मजेदार मीम्स...

Twitter Blue Tick Removed Memes
Benefits Of Panipuri : काय सांगता ! पाणीपुरी खाल्ल्याने वजन होते कमी ?

यूजर्सने लिहिले - लेगसी ब्लू टिक गेल्याबद्दल मला दु:ख होते आहे. दुसरा म्हणाला- पैसे द्या, ब्लू टिक घ्या. तिसरा म्हणाला- कोहलीचा, धोनीचा, रोनाल्डोचा... इलॉनने सगळ्यांचे ब्ल्यू टिक काढेल.

त्याच वेळी, दुसऱ्या यूजर्सने लिहिले - मजल्यावरून जमिनीवर आणले. @moronhumor नावाचा यूजर्स म्हणाला – आज रात्रीपासून ब्लू टिक ऑफ.

1. ट्विटर ब्लू टिक कोणाला मिळेल?

कोणत्याही ट्विटर वापरकर्त्याला ज्याला ब्लू टिक हवी आहे, किंवा आधीच मिळालेली ब्लू टिक टिकवून ठेवायची आहे, ला ट्विटर ब्लूचे सदस्यत्व घ्यावे लागेल. भारतात (India), ही सदस्यता 650 रुपयांपासून सुरू होते. मोबाईल वापरकर्त्यांसाठी त्याची किंमत 900 रुपये प्रति महिना आहे.

Twitter Blue Tick Removed Memes
Age Difference between Couples : बायकोपेक्षा- नवरा वयाने किती मोठा असावा ?

इलॉन मस्कने 12 एप्रिललाच घोषणा केली होती की 20 एप्रिलपासून सर्व लेगेसी व्हेरिफाईड खात्यांमधून ब्लू टिक्स काढून टाकले जातील. आता फक्त त्यांच्या वापरकर्त्यांना ही सुविधा मिळेल, जे ब्लू टिकसाठी पैसे खर्च करून मासिक योजना घेतील.  

बॉलीवूड स्टार शाहरुख खान, अमिताभ बच्चन ते दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली, एमएस धोनी, ब्लू टिक गमावलेल्या मोठ्या नावांमध्ये लोकांचा समावेश आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाउंटवरूनही ब्लू टिक्स गायब झाल्या आहेत. याशिवाय रोनाल्डो, बियॉन्से, पोप फ्रान्सिस, ओप्रा विन्फ्रे आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ब्लू टिक्सही हिसकावण्यात आल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com