Chanakya Niti Life Lesson: जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात यशस्वी व्हायचं आहे ? या मुली व मित्रांशी राहा नेहमीच लांब !

Life Lesson : आचार्य चाणाक्य नेहमीच यशाच्या मार्गासाठी आपल्याला वेळोवेळी सावध करत असतात.
Chanakya Niti
Chanakya NitiSaam Tv

Chanakya Niti On Life Lesson : आचार्य चाणाक्य नेहमीच यशाच्या मार्गासाठी आपल्याला वेळोवेळी सावध करत असतात. त्यांच्या दृष्टीकोनातून आपल्याला यश प्राप्त होते. त्यांनी राज्यकारभार आणि राज्याच्या यशाबद्दल केवळ सूचनाच दिल्या नाहीत तर समाज, कुटुंब आणि व्यक्ती यांच्या यशाबद्दल त्यांनी लिहिले आहे.

चाणक्य सांगतात की प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात यशस्वी व्हायचे असते आणि स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला चांगले आयुष्य द्यायचे असते. जीवनात यश मिळवण्यासाठी आचार्य चाणक्यांनी जीवनात अवलंब केल्यास माणूस यशाच्या (Success) दिशेने एक पाऊल पुढे टाकू शकतो-

Chanakya Niti
Chanakya Niti : जीवनात कोणत्याही टप्प्यात मिळतोय सतत धोका ! चाणक्यांच्या या गोष्टी जरुर लक्षात ठेवा

1. अधीत्येदं यथाशास्त्रं नरो जानाति सत्तमः।

धर्मोपदेशं विख्यातं कार्याऽकार्य शुभाऽशुभम्।।

हे सर्वज्ञात आहे की नीतिमत्तेचे नियम चांगले आणि वाईट आहेत या श्लोकाद्वारे चाणक्य सांगतात की, जो व्यक्ती सतत शिक्षण घेत राहतो, त्याला योग्य-अयोग्याची चांगली ओळख होते. शास्त्रानुसार ज्ञान प्राप्त करून तो नेहमी चांगल्या-वाईटाचा भेदभाव करून योग्य मार्गावर चालतो, कोणता मार्ग त्याला यशाकडे घेऊन जातो. म्हणजेच, माणसाने शिक्षण (Education) कधीही सोडू नये. आयुष्यभर ज्ञान मिळवून, आपण जीवनात चांगले निर्णय घेण्यास सक्षम होतो, जे शेवटी आपल्याला यशाच्या मार्गावर घेऊन जाते.

Chanakya Niti
Chanakya Niti : आयुष्यात या 3 गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका, अन्यथा जीवन होईल उद्धवस्त!

2. प्दुष्टाभार्या शठं मित्रं भृत्यश्चोत्तरदायकः।

ससर्पे च गृहे वासो मृत्युरेव नः संशयः।।

फसवणऱ्या मुली (Women) व मित्र असेल तर आपल्या शंकेचे मरण होय. यशाच्या मार्गातील अडथळे दूर करण्याच्या दृष्टिकोनातून हा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे. चाणक्य या श्लोकाद्वारे म्हणतात की दुष्ट पत्नी, खोटा मित्र, धूर्त नोकर यांना वेळीच ओळखले पाहिजे आणि त्यांच्यापासून अंतर राखले पाहिजे. असे केले नाही तर या लोकांच्या संपर्कात राहिल्याने स्वतःचे नुकसान होते आणि दुःखही होते. जीवनात यशस्वी होण्यासाठी अशा धूर्त आणि दुष्ट लोकांपासून दूर जाणे आवश्यक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com