Smartphone Blast
Smartphone BlastSaam Tv

Smartphone Blast : स्मार्टफोनचा ब्लास्ट कसा होतो? वापरताना काय काळजी घ्याल?,या गोष्टी लक्षात ठेवा

Avoid This Mistake Using Smartphone : स्मार्टफोनचा ब्लास्ट का होतो? फोन वापरताना काय काळजी घ्यावी जाणून घेऊया

Reasons Why Smartphones Blast :

नुकतेच नाशिक शहरात फोनचा ब्लास्ट झाल्याची घटना समोर आली आहे. फोनचा ब्लास्टच्या घटना वारंवार समोर येत असतात. याची अनेक कारणे अनेकवेळा समोर आली आहे. पण स्मार्टफोनचा ब्लास्ट का होतो? फोन वापरताना काय काळजी घ्यावी जाणून घेऊया

अनेकदा स्मार्टफोन खराब होतो किंवा चुकीच्या वापरामुळे त्याचा ब्लास्ट होतो. तुमच्या सोबतही अशा घटना होऊ नये यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे अधिक आवश्यक आहे. जाणून घेऊया फोन वापरताना कशी काळजी घ्यायची

Smartphone Blast
Bad Cholesterol : सतत वाढणाऱ्या कोलेस्ट्रॉलमुळे वैतागले आहात? आयुर्वेदातील हा उपाय ठरेल रामबाण

फोन वापरताना या गोष्टींची काळजी घ्या

1. फोन (Phone) खराब झाला असेल तर तो कोणत्याही दुकानातून रिपेअर करुन घेऊ नका. फोन दुरुस्त करताना तो Service Centre वर जाऊन दुरुस्त करा.

2. आपल्यापैकी अनेकांना फोनमध्ये गेम्स खेळण्याची सवय असते. त्यामुळे फोन पटकन गरम होतो. याचे सगळ्यात मोठे कारण फोनचा प्रोसेसर (processor) आहे. जेव्हा प्रोसेसर लोड घेत नाही तेव्हा तो गरम होऊ लागतो. अशावेळी स्विच ऑफ करुन थोड्यावेळाने स्विच ऑन करा

3. सतत फोनचा वापर करु नका, यामुळे फोनची बॅटरी अधिक काळ टिकत नाही. तसेच सूर्यप्रकाश किंवा बंद कारमध्ये फोन राहिल्यास बॅटरीवर (Battery) परिणाम होतो. ज्यामुळे तो गरम होतो.

4. फोन चार्ज करताना पावर स्ट्रिप किंवा एक्स्टेंशन कार्डमध्ये प्लग करुन चार्ज करु नका. यामुळे शॉट सर्किटचा धोका वाढतो.

5. फोन चार्जिंगसाठी त्याचे ओरिजनल चार्जर वापरा. दुसऱ्या कोणत्याही फोनचे चार्जवर वापरु नका. तसेच कार चार्जिंगचे Adpter वापरु नका. यासाठी पर्याय म्हणून पावर बँकचा वापर करु शकता.

Smartphone Blast
Money Saving Tips : महिना संपण्यापूर्वीच पाकीट खाली होतंय? अशी करा बचत

6. फोन नवीन अन् चार्जर डुप्लिकेट वापरण्याची सवय अनेकांना असते. स्वस्तात मस्त चार्जर खरेदी करण्याची आणि पैसे वाचवण्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करतो परंतु यामुळे बॅटरीवर ताण येतो. ज्यामुळे ब्लास्ट होण्याची शक्यता अधिक असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com