Diarrhea Prevention Tips : वाढत्या उन्हाळ्यात बिघडले पोट तर काय कराल ? कशी घ्याल काळजी ?

Dehydration : वाढत्या तापमानामुळे आपल्याला काळजी घेण्याचे आव्हान करण्यात येत आहे.
Diarrhea Prevention Tips
Diarrhea Prevention Tips Saam Tv

Summer Care Tips : वाढत्या उन्हाळ्यात आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकालाच या ऋतूचा त्रास होतो. वाढत्या तापमानामुळे आपल्याला काळजी घेण्याचे आव्हान करण्यात येत आहे.

उन्हाळ्यात अन्न (Food) लवकर खराब होते आणि बरेचदा लोक त्याकडे दुर्लक्ष करून ते असे खातात, तेव्हा अन्नामध्ये असलेले धोकादायक बॅक्टेरिया त्यांच्या शरीरात प्रवेश करतात, ज्यामुळे पोटात (Stomach) तीव्र वेदना सुरू होतात. याला अतिसार म्हणतात.

Diarrhea Prevention Tips
How to Clean Stomach : सकाळी सकाळी पोट साफ होत नाही? वापरून पहा या टिप्स, दिवसभर राहाल फ्रेश

अतिसार हा जीवाणू आणि विषाणूंमुळे होतो. रोटाव्हायरस हे मुलांमध्ये तीव्र अतिसाराचे एक सामान्य कारण आहे. दूषित अन्न किंवा पाण्यातील (Water) जीवाणू आणि परजीवी पोटात गेल्यावर अतिसार होतात.

1. डायरियाची समस्या काय आहे?

अतिसारामध्ये मल पातळ पाण्यासारखा येतो. पोटात मुरगळणे, पेटके येणे, दुखणे अशी समस्या देखील आहे. दिवसातून अनेक वेळा जुलाब झाल्यास शरीरात पाण्याची कमतरता तयार होते, ज्यामुळे व्यक्ती डिहायड्रेशनचा बळी ठरू शकते.

Diarrhea Prevention Tips
Age Difference between Couples : बायकोपेक्षा- नवरा वयाने किती मोठा असावा ?

2. अतिसार का होतो?

उन्हाळ्यात रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या अतिसेवनामुळे जुलाब होऊ शकतात. यासोबतच शिळे आणि दूषित अन्न खाल्ल्याने, काही औषधांचे (Medicine) सतत सेवन, काही विषाणू, अपचन, लहान किंवा मोठ्या आतड्यांमधील कोणतीही समस्या यामुळेही जुलाब होऊ शकतात.

3. अतिसाराची लक्षणे

- डोकेदुखी आणि थकवा

- लघवी कमी होणे

- चक्कर येणे सह चिडचिड

- बाळाच्या पोटात पेटके येण्याची तक्रार

- कोरडे तोंड

- मळमळ आणि निर्जलीकरण

- आळस आणि जास्त झोप

Diarrhea Prevention Tips
Weight And Height Calculate : वयानुसार किती असायला हवे आपले वजन?

4. या गोष्टी लक्षात ठेवा

-रस आणि द्रव प्या

- ORS सोल्युशन देत राहा

- फायबर युक्त भाज्यांचे सेवन करा

- खाण्यापूर्वी मुलांचे हात साबणाने चांगले धुवा.

- प्रवासादरम्यान मुलांना फक्त न उघडलेली बाटलीबंद पाणी द्या.

- फक्त आरओचे पाणी द्या.

5. इतर उपाय

  • अतिसार टाळण्यासाठी बाहेरचे अन्न खाणे टाळा.

  • दिवसातून किमान तीन लिटर पाणी प्या. जेणेकरून शरीर हायड्रेटेड राहते.

  • शिळे अन्न खाणे टाळावे.

  • नारळ आणि लिंबू पाण्याचे सेवन देखील अतिसारापासून आराम देण्यासाठी प्रभावी आहे. यामुळे शरीर हायड्रेटेड राहील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com